आता लॉकडाऊन नाहीच!-आरोग्य मंत्री राजेश टोपे

पुणे, 26 जून :
राज्यात आता लॉकडाऊन करण्यात येणार नाही. केंद्र असो वा राज्य, यापुढे लॉकडाऊनचा विषय राहणार नाही, उलट अन्लॉक हाच महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज शुक‘वारी येथे केली.
आता आम्ही अन्लॉकवरच भर देणार आहोत. अर्थात्‌ जनजीवन सुरळीत कसे आणायचे, उद्योग, व्यवसाय कसे सुरू करायचे, हा आमचा विषय असणार आहे. यापुढे अन्लॉकचे काही टप्पे राबविण्यात येणार आहेत आणि या प्रत्येक टप्प्यात राज्यातील सर्व काही सुरळीत होणार आहे, असे राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राज्यात कोरोनाबाधित वाढत आहेत, हा िंचतेचा विषय असला, तरी मृतांची आकडेवारी वाढत आहे, हा त्यापेक्षाही गंभीर िंचतेचा विषय आहे, असेही ते म्हणाले.

कोरोनामुळे झालेला एकही रुग्ण आमच्या सरकारने लपवला नाही. विरोधकांची या संदर्भातील टीका निराधार आहे. महाविकास आघाडी सरकारचा कारभार पारदर्शक आणि प्रामाणिकपणे सुरू आहे, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रात चाचण्या कमी झाल्या, या आरोपात तथ्य नाही. देशात सर्वाधिक चाचण्या मुंबई, पुण्यात घेण्यात आल्या. एक लाखामागे मुंबईत 22 हजार आणि पुण्यात 15 हजार चाचण्या होत आहेत. पुणे आणि सोलापुरात कोरोनाबाधित वाढत आहेत, हे शरद पवार यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर मी आणि अनिल देशमुख आढावा घेत आहोत, असे त्यांनी सांगितले.

पुणे शहरासह जिल्ह्यात ‘मुंबई पॅटर्न’ राबवा – आरोग्य मंत्री राजेश टोपे
कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजनेचा भाग म्हणून मुंबई शहराच्या धर्तीवर पुणे शहरासह जिल्ह्यात ‘मुंबई पॅटर्न’ राबवा, असे निर्देश राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिले. आरोग्य मंत्री टोपे म्हणाले, पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोना चाचण्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची वाढ होत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई शहराच्या धर्तीवर पुण्यात उपाययोजना करण्याची गरज आहे. मुंबई महानगरपालिकेने खासगी रुग्णालयातील बेड्स ताब्यात घेतली आहेत. त्या रुग्णालयात एक जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली आहे. त्या अधिकाऱ्यांनी रुग्णालय व्यवस्थापनाच्या मदतीने एक फ्लोचार्ट करावा. त्यामध्ये रुग्णालयात किती बेड्स उपलब्ध आहेत, त्यापैकी आयसीयूचे बेड, व्हेंटीलेटर बेडस्, पीपीई कीट, मास्क इत्यादी बाबी नमूद कराव्यात. जेणेकरुन नागरिकांना त्याचा लाभ होईल. कोरोनाबाधित रुग्णांकडून जादा पैसे घेणाऱ्या व शासकीय निर्देशाचे पालन न करणाऱ्या खासगी रुग्णालयावर कारवाई करण्याच्या सूचना केल्या. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून रुग्णावर मोफत उपचार करावा अशा सूचनाही दिल्या.
आरोग्य मंत्री टोपे म्हणाले, स्थानिक प्रशासनाने लोकप्रतिनिधींना सोबत घेवून काम करावे, लोकांच्या मनात कोरोना विषाणूविषयीची भीती कमी करण्यासाठी सोशल मिडीया तसेच दूरचित्रवाणी, होर्डिग्ज, भिंतीपत्रके, रेडीओ यांचा वापर करण्याबरोबरच लोकप्रतिनिधींना विचारात घेवून जनजागृती करण्यावर भर द्यावा. लहान बाळापासून ते वयोवृध्द आजीपर्यंत अनेकजण कोरोना आजारातून बरे झाले आहेत. त्यांच्या अनुभवातून ‘यशकथा’ तयार कराव्याजत. राज्यात ॲण्टीजेन चाचणी पाठोपाठ अॅण्टीजबॉडीज चाचण्या करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये किती लोकांना संसर्ग झाला याची माहिती या चाचणीद्वारे मिळणार आहे. नागरिक हा केंद्रबिंदू मानून माणुसकी आणि मानवतेच्यास दृष्टिने सर्वांनी एकत्र येवून कोरोना विषाणूवर मात करण्याचे आवाहनही टोपे यांनी केले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *