विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी

बीड, ७ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी आज बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे झालेल्या या नुकसानीची पाहणी करण्यासाठी भेट दिली.यावेळी त्यांच्या सोबत जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा,  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  बी.  के.  जेजूरकर तसेच महसूल,  जिल्हा परिषद,  कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

त्यांनी बीड तालुक्यातील नांदूर हवेली, माळापुरी या गावांना भेट देत शेतात जाऊन पिक नुकसानीची पाहणी केली.  तसेच औरंगपूर येथे सिंदफना नदीवरील  बंधाऱ्याची पाहणी केली. यासह किन्हीपाई येथे भेट देऊन पाहणी केली.

यावेळी त्यांनी शेतकर्‍यांशी चर्चा करून अडचणी त्यांच्या जाणून घेतल्या.  याप्रसंगी उपस्थितांनी आणि अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या परिस्थितीची माहिती दिली.