भारतातील एकूण कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने केला 83 कोटींचा महत्वपूर्ण टप्पा पार

  • गेल्या 24 तासात 71 लाखांहून अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या.
  • भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 97.77%
  • गेल्या 24 तासात कोरोनाच्या 31,923 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद
  • देशातली सध्या उपचाराधीन रुग्णसंख्या (3,01,640) एकूण रुग्णांच्या 0.90% आहे.
  • साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (2.11%) गेले 90 दिवस 3% पेक्षा कमी

नवी दिल्ली, २३ सप्टेंबर /प्रतिनिधी :- भारतात गेल्या 24 तासात 71,38,205 मात्रा, देण्यात आल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसींच्या आतापर्यंत एकूण 83 कोटींपेक्षा अधिक मात्रा (83,39,90,049) देण्यात आल्या आहेत. एकूण 81,69,260 सत्रांद्वारे या मात्रा देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासात 31,990 रुग्ण कोविडमुक्त झाले असून (महामारीच्या सुरवातीपासून) यामुळे कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,28,15,731 रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. त्यामुळे बरे होण्याचा दर आता 97.77%.झाला आहे. बरे होण्याचा दर सध्या गेल्या मार्च 2020 पासून सर्वाधिक स्तरावर आहे.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,01,640 आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या, आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 0.90% आहेत. ही गेल्या मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे.

देशभरात चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु आहे. देशात गेल्या 24 तासात एकूण 15,27,443 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 55.83 कोटींहून अधिक (55,83,67,013) चाचण्या केल्या आहेत.


देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 2.11% असून गेले 90 दिवस 3% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 2.09% इतका आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर गेले 24 दिवस 3% पेक्षा कमी आणि 107 दिवस 5% पेक्षा कमी आहे.