राहुल गांधींना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा,भिवंडी कोर्टाचा निकाल कायम

मुंबई ,२० सप्टेंबर /प्रतिनिधी :- काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. आपल्या एका भाषणात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत राहुल गांधी यांनी केलेले विधान पुरावा म्हणून दाखल करण्याची मागणी करणारी याचिका सोमवारी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. रा. स्व. संघाच्या भिवंडीतील एका स्वयंसेवकाने भिवंडी न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती.

mana _1  H x W:

रा. स्व. संघाचे स्वंयसेवक राजेश कुंटे यांनी उच्च न्यायालयात भिंवडी दंडाधिकारी न्यायालयाच्या यासंदर्भातील निर्णयाविरोधात एक याचिका दाखल केली होती. राहुल गांधी यांनी मार्च 2014 मध्ये भिंवडीमधील एका जाहीर सभेत महात्मा गांधींच्या हत्येबाबत विधान करताना, ‘ही हत्या संघाच्या लोकांनी केली’, असा उल्लेख केल्याचा आरोप कुंटे यांनी केला आहे.