भारतातील दैनंदिन रूग्णसंख्या घटत रहाण्याचा कल कायम

दैनंदिन नवीन रूग्णसंख्या गेल्या 46 दिवसात सर्वात कमी
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 8.02% 
सतत 6 व्या दिवशी पॉझिटिव्हिटी दर 10% पेक्षा कमी रहाण्याचा कल कायम

नवी दिल्ली ,३० मे /प्रतिनिधी:-भारतातील  दैनंदिन सक्रीय रूग्णसंख्या घटत रहाण्याचा कल सतत  कायम राहिल्याचे दिसून येत  आहे. आज सक्रीय रुग्णसंख्या आणखी  घटून 21,14,508  इतकी नोंदविली गेली आहे

गेल्या 24 तासांत एकूण  रूग्णसंख्येत  1,14,216  ची घट नोंदविली गेली असून  आता देशातील एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येपैकी  सक्रीय रुग्णसंख्येचे  प्रमाण  7.58%  इतके आहे.दैनंदिन  नवीन रूग्णसंख्येत सतत घट झालेली आढळत  असून, सलग तिसऱ्या दिवशी  2 लाखांहून कमी  नव्या  रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत दैनंदिन 1,65,553  नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

सलग  17 व्या  दिवशी कोविडमुक्त होणाऱ्या रूग्णांची संख्या, उपचाराधीन रूग्णांच्या  तुलनेत वाढलेली दिसून आली  असून  गेल्या 24 तासांत 2,76,309 रूग्ण कोविडमुक्त झाल्याची नोंद झाली आहे..दैनंदिन नवीन रूणांच्या तुलनेत गेल्या 24 तासांत 1,10,756 अधिक रूग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे.

महामारीच्या आजाराची लागण सुरू झाल्यापासून आजपर्यंत संसर्ग झालेल्या लोकांपैकी 2,54,54,320 रूग्ण  आधीच कोविड -19 आजारातून बरे झाले आहेत आणि गेल्या 24  तासांत 2,76,309 रुग्ण बरे झाले आहेत. यानुसार बरे होण्याचा एकूण दर 91.25% आहे.गेल्या 24 तासात देशात एकूण 20,63,839 चाचण्या घेण्यात आल्या आणि आतापर्यंत भारताने एकूण 34.31 कोटी चाचण्या पूर्ण केल्या आहेत.

देशभरात एकीकडे चाचण्यांची संख्या  वाढविण्यात आली आहे, परंतु साप्ताहिक  रूग्णसंख्येमध्ये सतत घट दिसून येत आहे. साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 9.36% वर आहे तर दैनिक पॉझिटीव्हिटी दर कमी झाला असून तो आज 8.02% वर आहे. आता सलग 6 दिवस हा दर  10% पेक्षा कमी राहिला आहे.राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आज देशभरात दिल्या जाणाऱ्या  कोविड -19 लसींच्या एकूण संख्येने  21.20  कोटीचा टप्पा ओलांडला आहे.

आज सकाळी  7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या  तात्पुरत्या अहवालानुसार, एकूण 21,20,66,614. लसींच्या मात्रा  30,07,831 सत्रांद्वारे देण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 30.35 लाख (30,35,749) पेक्षा जास्त लसींच्या मात्रा  देण्यात आल्या आहेत.