पतंजलीचे ‘कोरोनिल’ औषध बाजारात ,7 दिवसांत कोरोनाचा रुग्ण 100 टक्के बरा – बाबा रामदेव यांचा दावा

नवी दिल्ली,
देशातच नव्हे,तर जगभरात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव अजूनही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक देशात कोरोनावरील प्रभावी लस संशोधनाचे कार्य सुरुच आहे. अशाच परिस्थितीत योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कोरोनावरील आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ हे औषध जगासमोर आणले आहे.

A video grab

हरिद्वारच्या पतंजली योगपीठात योगगुरू बाबा रामदेव व आचार्य बालकृष्ण यांच्या उपस्थितीत ‘कोरोनिल’ हे आयुर्वेदिक औषध सादर करण्यात आले आहे.
कोरोनावरील पहिले आयुर्वेदिक औषध तयार करण्यात आले आहे. या औषधाच्या मदतीने आम्ही कोरोनाच्या सर्व प्रकारच्या गुंतागुंतीवर नियंत्रण ठेवू शकू, असे मत बाबा रामदेव यांनी यावेळी व्यक्त केले. या औषधाच्या साहाय्याने तीन दिवसांच्या आत 69 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. तर रुग्णांनी 7 दिवसांत 100 टक्के कोरोनावर मात केली आहे. या औषधाची चाचणी 280 जणांवर करण्यात आली, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.