लातूरमध्ये 100 खाटांचे जम्बो कोव्हिड सेंटर

पालकमंत्री अमित देशमुख यांनी केली​ पाहणी ​

लातूर,​१ मे /प्रतिनिधी ​

कोविड​ ​१९ प्रादुर्भाव आणि वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन लातूर महानगरपालीकेच्या वतीने ग्रामदैवत सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थान परिसरात जम्बो कोवीड सेंटरची उभारणी करण्यात आली असून या ठिकाणी  पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी  तेथील एकूण व्यवस्थेची पाहणी केली.         

प्रारंभी या ठिकाणी  ६० ऑक्सिजनेटेड बेडसह एकूण १०० बेडची व्यवस्था करण्यात  आली आहे लवकरच येथे २० व्हेंटिलेटरची व्यवस्था केली जाणार आहे. या सेंटरमध्ये स्वतंत्र स्त्री, पुरुष कक्ष उभारले असुन  रूग्णवाहीका, नास्टा, जेवण, पाणी या सुविधाही पुरवल्या जाणार आहेत.             

यावेळी पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सोबत मनपा महापौर विक्रांत गोजमगुंडे, ॲड. दीपक  सूळ, जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज, पोलीस अधीक्षक  निखिल पिंगळे, मनपा आयुक्त अमन मित्तल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, लातूर शहर काँग्रेस अध्यक्ष ॲड. किरण जाधव, समद पटेल, इम्रान सय्यद, रघुनाथ मदने, तबरेज तांबोळी, युनूस मोमीन, महेश काळे, अय्युब मणियार, ॲड. प्रदीपसिंह गंगणे यांच्यासह मनपा पदाधिकारी, सदस्य, उपस्थित होते.