उमरगा-लोहारा तालुक्यातील 31 गावांसाठी 4.50 कोटी रु.मंजूर

उमरगा ,२९ एप्रिल /प्रतिनिधी 

उमरगा-लोहारा तालुक्यातील 31 गावांसाठी 4.50 कोटी रु. मंजूर झाले असून या निधी अंतर्गत रस्ते व हायमस्ट लॅम्पची कामे होणार असल्याची माहिती आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली. 
ग्रामीण भागामध्ये अनेक गावात,गावांतर्गत पक्के रस्ते नसल्याने नागरिकांना पावसाळ्यात अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत असतो.यासाठी ग्रामपंचायतीकडे पुरेसा निधीही उपलब्ध होत नाही.  या अनुषंगाने आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उमरगा लोहारा तालुक्यातील गावांसाठी 25/15 योजनेअंतर्गत निधी मिळणेबाबत ग्रामविकास विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. 
त्यानुसार सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठी लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावंतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे या योजनेअंतर्गत उमरगा व लोहारा तालुक्यातील 31 गावांसाठी एकूण 4 कोटी 50 लक्ष रु. इतक्या निधीचे अनुदान ग्रामविकास व पंचायतराज विभाग महाराष्ट्र शासन द्वारे वितरित करण्यात आला आहे. या निधीतून खालील गावांमध्ये अंतर्गत रस्ते व हायमस्ट लॅम्प / सौर पथदिव्यांची कामे करण्यात येणार असल्याची माहिती आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली. 

————————————————

ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध ,गावांना बक्षिसी 

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रत्त्येकी 25 लाखांचा विकासनिधी देण्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी त्यावेळी घोषित केले होते. त्यानुसार ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध पार पडणाऱ्या गावांचा यात प्राधान्याने समावेश करण्यात आला आहे.

—————————————————

उमरगा तालुका 

1) जकेकुर – सिमेंट रस्ता – 15 लक्ष,हायमस्ट – 5 लक्ष, 

2) मुळज – सिमेंट रस्ता – 15 लक्ष.हायमस्ट – 5 लक्ष.

3) जकेकुरवाडी -सिमेंट रस्ता-10 लक्ष ,हायमस्ट – 5 लक्ष

4) मातोळा – सिमेंट रस्ता – 10 लक्ष ,हायमस्ट – 5 लक्ष

5) एकोंडी ज. – सिमेंट रस्ता – 10 लक्ष ,हायमस्ट – 5 लक्ष

6) चिंचकोट – सिमेंट रस्ता – 10 लक्ष , हायमस्ट – 5 लक्ष

7) कोळसुर गुं.- सिमेंट रस्ता – 10 लक्ष ,हायमस्ट – 5 लक्ष

8) पळसगाव – सिमेंट रस्ता – 10 लक्ष,हायमस्ट – 5 लक्ष

9) भिकार सांगवी – सिमेंट रस्ता – 10 लक्ष, हायमस्ट – 5 लक्ष
10) बाभळसुर – सिमेंट रस्ता – 10लक्ष ,हायमस्ट – 5 लक्ष

11) आलूर – सिमेंट रस्ता – 15 लक्ष

12) कवठा – सिमेंट रस्ता – 15 लक्ष

13) नाईचाकूर – सिमेंट रस्ता – 15 लक्ष

14) बलसुर – सिमेंट रस्ता करणे. – 15 लक्ष. 

15) बेळम्ब – सिमेंट रस्ता – 10 लक्ष

16) गुगळगाव – सिमेंट रस्ता -10 लक्ष.

17) मळगी – सिमेंट रस्ता – 10 लक्ष.

18) कोराळ – सिमेंट रस्ता – 10 

19) कसगी – सिमेंट रस्ता – 10 लक्ष.

20) गुगळगाव – सिमेंट रस्ता – 05 लक्ष.
लोहारा तालुका 

1) आरणी – सिमेंट रस्ता – 10 लक्ष व हायमस्ट साठी 05 लक्ष.
2)  मार्डी – सिमेंट रस्ता – 10 लक्ष व हायमस्ट साठी 05 लक्ष.
3) धानुरी – सिमेंट रस्ता – 15 लक्ष व हायमस्ट साठी 05 लक्ष.
4)  राजेगाव – सिमेंट रस्ता – 10 लक्ष व हायमस्ट साठी 05 लक्ष.
5) तावशीगड – सिमेंट रस्ता – 15 लक्ष, हायमस्ट साठी 5 कलश
6)  भातागळीं – सिमेंट रस्ता – 15 लक्ष.
7)  जेवळी – सिमेंट रस्ता – 15 लक्ष.
8) अचलेर – सिमेंट रस्ता – 15 लक्ष.
9) रेबे चिंचोली – सिमेंट रस्ता – 15 लक्ष रु.
10)  उदतपूर  – सिमेंट रस्ता – 10 लक्ष रु.
11) आष्टा का.  – सिमेंट रस्ता – 15 लक्ष.
असा एकूण 4 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.