रस्ते कामे वेळेत पूर्ण करा – सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री भरणे

Image may contain: 3 people, people sitting and indoor

औरंगाबाद, दिनांक 19 : जिल्ह्यातील रस्ते कामांची अर्थसंकल्प अंदाजपत्रके तयार करून निविदा प्रक्रिया तत्काळ पूर्ण कराव्यात, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या.

सुभेदारी विश्रामगृहात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत श्री. भरणे बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता डी.डी. उकिर्डे, अधीक्षक अभियंता एस.जी. देशपांडे, कार्यकारी अभियंता एस. एस. भगत, कार्यकारी अभियंता वाय.बी. कुलकर्णी, नरसिंग भंडे आदींसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अध‍िकारी उपस्थित होते.