शरद पवार यांची प्रकृती उत्तम

मुंबई ,२४ एप्रिल /प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या पित्ताशयावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर आज त्यांना नियमित तपासणीसाठी पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले होते. दरम्यान त्यांच्या तोंडात अल्सर आढळून आल्यानंतर तो काढण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

पवार यांची प्रकृती उत्तम असून ते आता रुग्णालयात विश्रांती घेत आहेत. सध्या पवार हे रुग्णालयातूनच कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत व सरकारला योग्य ते निर्देश देत आहेत. ते लवकरच आपले कामकाज पुन्हा सुरू करतील, असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.