पुणे विभागातून २ लाख ६ हजार प्रवाशांना घेऊन १५४ विशेष रेल्वेगाड्या रवाना

पुणे विभागात कोरोना बाधित १२०० रुग्ण – विभागीय आयुक्त

पुणेदि. 8 : लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मध्य प्रदेशउत्तर प्रदेशउत्तराखंडतामिळनाडूराजस्थानबिहार,  हिमाचलझारखंडछत्तीसगडजम्मू आणि काश्मिरमणिपूरआसाम,ओरिसापश्चिम बंगाल व मिझोराम या राज्यामधील 2 लाख  6 हजार 8  प्रवाशांना घेऊन पुणे विभागातून  7 जून  2020 अखेर 154 विशेष रेल्वेगाड्या रवाना झाल्याची माहिती विभागीय आयुक्त  डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

डॉ.म्हैसेकर म्हणालेपुणे विभागातून मध्य प्रदेशसाठी 15उत्तर प्रदेशसाठी 62उत्तराखंडसाठी 2तामिळनाडूसाठी 2राजस्थानसाठी 5बिहारसाठी 36हिमाचल प्रदेशसाठी 1झारखंडसाठी 8छत्तीसगडसाठी 5जम्मू आणि काश्मीरसाठी 1मणिपूरसाठी 1,      आसामसाठी 1ओरिसासाठी 2पश्चिम बंगालसाठी 12 आणि मिझोराम 1 अशा एकूण 154  रेल्वेगाड्या 2  लाख  6 हजार 8  प्रवाशांना घेऊन रवाना झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *