कोरोनाच्या उपचारासाठी रुग्णालयातआणखी दोनशे खाटांची वाढ – पालकमंत्री अशोक चव्हाण

जिल्ह्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी नागरिकांचे प्रशासनाला सहकार्य अत्यावश्यक

नांदेड दि. 30 :- जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेचा जरी असला तरी या प्रादुर्भावातून जनतेला सुरक्षित राहता यावे, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे वेळोवेळी विविध उपाययोजनांसह आवाहनही केले जात आहे. आरोग्य सुविधेच्या दृष्टिने आपल्या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयासह ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रापर्यंत एक उत्तम व्यवस्था आहे. वाढती बाधितांची संख्या लक्षात घेता आता आणखी शासकीय रुग्णालयामध्ये दोनशे खाटा वाढविण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

May be an image of one or more people, people sitting and indoor

आज डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यलयाचे अधिष्ठाता दिलीप म्हैसेकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सिरसीकर आदिंची यावेळी उपस्थिती होती.

कोरोना सदृश्य आजार असल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णांनी काळजी, स्वयंशिस्त व उपचार घेणे यातच सर्वांचे हित आहे. केवळ भितीपोटी रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाकडे आग्रह धरला नाही तर स्वाभाविकच जे खरे गरजू आहेत त्या कोरोना रुग्णांना अधिक चांगल्या प्रकारे वैद्यकीय सुविधा पोहचविणे रुग्णालय व्यवस्थापनाला शक्य होईल, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

आजच्या घडीला मागील कांही दिवसापासून दिवसाला एक हजाराहून अधिक बाधित निघत असून बरे होवून घरी जाणाऱ्यांचेही प्रमाण अधिक आहे. ज्यांना लक्षणे नाहीत व जे बाधित गोळ्या, औषधातून बरे होणारे आहेत अशा असिम्टोमॅटिक व्यक्तींसाठी आपण महसूल भवन आणि एनआरआय कोविड केअर सेंटर टप्प्या – टप्प्याने वाढवित आहोत. जिल्हा रुग्णालयात 60 ते 70 बेड्स, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात 70 ते 120 बेड्स तर खाजगी दवाखान्यात जवळपास 20 ते 30 बेड्स वाढविले जात आहे. आरोग्यासाठी निधीची कमतरता नाही. जिल्ह्याला अतिरिक्त निधी कसा उपलब्ध होईल यादृष्टिने आम्ही नियोजन केले असल्याची माहिती पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.