मनमुख जिव सुख ना मिले:स्वर्वेद तृतीय मण्डल प्रथम अध्याय

” स्वर्वेद “ हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.
आजचा दोहा

मनमुख जिव सुख ना मिले, मन अरि रह नित साथ ।

जग जीवन भरमावता, सद्गुरु शरण सनाथ ।।०२।।

(स्वर्वेद तृतीय मण्डल प्रथम अध्याय)०३/०१/०२ 

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :जीवाचा (आत्म्याचा) शत्रू मन आहे. तो अनेक जन्मांपासून जीवाबरोबर आहे. मनाच्या नाना प्रकारच्या आशा, वासनांनी जीव बांधला गेला आहे. जोपर्यंत मनाच्या प्रपंचांपासून जीव अलग होत नाही तोपर्यंत शांती मिळू शकत नाही. मनाच्या अनुकूल चालण्याने जीवाला सुख कधीच मिळणार नाही. मन जीवाला सदैव आपल्या जाळ्यात अडकवून त्याला नाना प्रकारच्या दृश्यांकडे घेऊन जाते आणि आत्म्याला दुःखी करते. म्हणून मनाला सोडून जीवांचे नाथ असलेल्या सद्गुरूंना शरण जाऊन आत्म्याच्या अनुकूल अध्यात्मिक जीवन निर्माण करून सुख शांती प्राप्त केली पाहिजे.

संदर्भ : स्वर्वेद 

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org