जालना जिल्ह्यात 96 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

194 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज– जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना दि.23 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीडहॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 194 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे.आरटीपीसीआरद्वारे 95 तर अँटीजेन तपासणीद्वारे 1 असे एकुण 96 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-16278असुन सध्या रुग्णालयात-177 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5689 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-494 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-65011 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-327, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-96 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-10237 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-54015, रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-383, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-4821

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-31, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-5215 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-19, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-130 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-24, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-177, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-26, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-194, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-8412, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1558 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-158387मृतांची संख्या-267.

जिल्ह्यात एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 31 नागरिकांकडून 4 हजार 500 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण 6 हजार 446 नागरीकांकडुन 12 लाख 81 हजार 744 रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.