हिंगोली जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 15 रुग्ण, दोघांचा मृत्यू

221 रुग्णांवर उपचार सुरु,35 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

हिंगोली,दि. 7 : जिल्ह्यात 15 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी आज दिली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 08 व्यक्ती, औंढा परिसरात 03 व्यक्ती व कळमनुरी परिसरात 02 व्यक्ती तर आरटीपीसीआर टेस्टद्वारे हिंगोली परिसर 01 व्यक्ती व कळमनुरी परिसर 01 व्यक्ती असे एकूण 15 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 35 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज दोन कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 32 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोविड-19 च्या 09 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 41 रुग्णांची सद्य:स्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 2 हजार 774 रुग्ण झाले असून, त्यापैकी 2 हजार 511 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 221 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 42 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक किशोरप्रसाद श्रीवास यांनी कळविले आहे.