प्रदूषणाची ऐसी की तैसी : कोर्टाचे निर्देश आणि पालिकेचे नियम धाब्यावर

वायू प्रदूषण: दिवाळीच्या फटाक्यांमुळे ही देशातील १० सर्वाधिक प्रदूषित शहरे

हवेची गुणवत्ता पातळी भयंकर खालावली… पोहोचली ३०० जवळ

दिल्लीतही प्रदूषणाने गाठली धोकादायक पातळी

मुंबई : मुंबईत प्रदूषणाचे प्रमाण प्रचंड वाढल्याने मुंबई महापालिकेने दिवाळीदरम्यान नागरिकांसाठी काही नियमांची आखणी करुन दिली होती. दिवाळीत फोडण्यात येणार्‍या फटाक्यांमुळे तर अनेकांना श्वसनाचे विकार उद्भवतात. मात्र, या गोष्टींची जाण असूनही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबईकरांनी प्रदूषण नियंत्रणाचे नियम चांगलेच धाब्यावर बसवल्याचे दिसून आले. यामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी २८८ वर पोहोचली, जी अतिशय गंभीर आहे.

मुंबईकरांसाठी रात्री ८ ते १० या वेळेत फटाके फोडण्याची परवानगी देण्यात आली होती. फक्त पालिकेचेनेच नव्हे तर दोन तासच फटाके फोडावे असे स्पष्ट निर्देश कोर्टाने दिले होते. मात्र संध्याकाळी लवकरच फटाके फोडण्यास सुरुवात झाली. शिवाय सकाळच्या वेळेत आणि मध्यरात्रीही हे फटाके फोडणे सुरुच होते. माहितीनुसार, तब्बल १५० कोटींचे फटाके केवळ मुंबईतच फोडले गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबईकरांना वाढत चाललेल्या प्रदूषणाची जाण कधी येणार हा एक मोठा प्रश्नच आहे.

गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता काहीशी नियंत्रणात होती. मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाकडून बांधकामे स्थगित करण्यासाठीचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे दिवाळीआधी मुंबईच्या हवेची पातळी काहीशी सुधारली होती. पण, आता दिवाळीमध्ये हवेची पातळी पुन्हा घसरली आहे आणि याला मुंबईकर देखील जबाबदार आहेत.

दिल्लीतही प्रदूषणाने गाठली धोकादायक पातळी

दिल्लीत दिवाळीनंतर हवेची गुणवत्ता पातळी पुन्हा एकदा वाईट श्रेणीत पोहोचली आहे. पाटणा, बिहारमध्ये तर ती अत्यंत वाईट श्रेणीत म्हणजे ३७० वर पोहोचली आहे. सोमवारी पहाटे दिल्ली-एनसीआरमध्ये धुराचे लोट दिसून आले. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसानंतर प्रदूषणाच्या पातळीत सुधारणा झाली होती, त्यानंतर पुन्हा एकदा दिल्लीची हवा पुन्हा खराब झाली आहे. सोमवारी सकाळपर्यंत दिल्लीतील पातळी ५१४ वर होती, ही अत्यंत गंभीर श्रेणी आहे.

दिवाळीच्या रात्री निघालेल्या फटाक्यांचे परिणाम भारतभर दिसून येतात. सोमवारी सकाळीच दिल्ली-एनसीआरमध्ये धुक्याची दाट चादर दिसली. मात्र, ही परिस्थिती केवळ या भागापुरती मर्यादित नसून दिवाळीनंतर इतर अनेक शहरांमध्येही प्रदूषणाचा हा परिणाम दिसून येत आहे. यामध्ये मुंबई आणि कोलकातासारख्या मेट्रो शहरांचाही समावेश आहे. दोन्ही शहरात सकाळीच धुके होते. 

भारतातील कोणती 10 शहरे सर्वाधिक प्रदूषित आहेत?
AQI.in या भारतातील रिअल-टाइम AQI माहिती देणार्‍या वेबसाइटनुसार, दिवाळीनंतर भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये दिल्लीचे नाव आहे, परंतु ते दुसऱ्या क्रमांकावर आहे. बिहारची राजधानी पाटणा पहिल्या क्रमांकावर आहे, जिथे सकाळी सरासरी AQI 572 नोंदवला गेला. तर, दुसऱ्या क्रमांकावर दिल्लीचा AQR ४६८ होता. दिल्लीच्या शेजारी असलेल्या उत्तर प्रदेशातील नोएडाचा AQI 410 म्हणजेच अत्यंत धोकादायक श्रेणीत नोंदवला गेला. त्याच वेळी, गाझियाबाद, यूपीमध्ये AQI 400 च्या वर आहे. दुसरीकडे, हरियाणाच्या रोहतकमध्ये AQI 380 च्या आसपास नोंदवले गेले. देशातील टॉप-5 प्रदूषित शहरांमध्ये दिल्ली-एनसीआरमधील तीन शहरांचा समावेश आहे. 

मेट्रो शहरांची स्थिती काय आहे?
दुसरीकडे, भारतीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, प्रदूषणामुळे भारतातील मेट्रो शहरांची स्थितीही अत्यंत वाईट आहे. मुंबईच्या बहुतांश भागात, AQI सरासरी 200 च्या आसपास राहतो. इथे सकाळी दिल्लीसारखी धुक्याची चादर दिसली. दुसरीकडे, पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील सहा पैकी पाच AQI स्थानकांमध्ये सरासरी 200 पेक्षा जास्त AQI नोंदवले गेले आहे. या मेट्रो शहरांव्यतिरिक्त, बंगळुरू, कर्नाटकमधील हवेची गुणवत्ता सर्वोत्तम आहे. येथील AQI चांगल्या ते मध्यम श्रेणीत (70-120) होता. 

संपूर्ण भारताच्या सरासरी AQI बद्दल बोललो तर दिवाळीनंतर त्याचा आकडा 182 वर पोहोचला आहे. जे हवेची खराब गुणवत्ता दर्शवते. सध्या, भारतातील सरासरी PM 2.5 कण 106 आहेत, जे जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मानकापेक्षा 7.1 पट जास्त आहे. दुसरीकडे, देशातील वातावरणात PM-10 चे सरासरी 151 कण आहेत, जे सामान्यपेक्षा कितीतरी जास्त आहे.