औरंगाबाद खंडपीठात सरन्यायधीश चंद्रचुड यांच्या हस्ते ध्वजारोहण

 छत्रपती संभाजीनगर,१४ सप्टेंबर /प्रतिनिधी :- मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ येथे हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त सरन्यायाधीश न्यायमुर्ती डी.वाय.चंद्रचूड यांच्या हस्ते दि.17 रोजी सकाळी 9 वा. ध्वजारोहण होणार आहे.

या सोहळ्यास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय एस.ओक, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश दिपांकर दत्ता, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय, कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रसन्न बी.वराळे, मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश  संजय व्ही.गंगापुरवाला, मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाचे वरिष्ठ न्यायाधीश रविंद्र घुगे, भारताचे अतिरिक्त सॉलिस्टर जनरल डी.जी.व्यास, महाराष्ट्राचे अधिवक्ता बिरेंद्र सराफ, मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाचे  रजिस्ट्रार विमलनाथ एस.तिवारी, मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार आर.एन.जोशी यांची उपस्थिती असणार आहे.