‘भारत चंद्रावर!’ -चांद्रमोहीम फत्ते!

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँड होणारा भारत हा पहिलाच देश

श्रीहरिकोटा : भारताचे चांद्रयान लँडर चंद्रावर भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी सुरक्षितरित्या लॅण्डिंग झाले. चंद्रावर सूर्योदयाला सुरुवात झाली आणि चांद्रयानाचे सॉफ्ट लॅण्डिंग झाले. अशी कामगिरी करणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे.

२०१९ मधील चांद्रयान-२चा अनुभव लक्षात घेऊन इस्रोने चांद्रयान-३ साठी संपूर्ण काळजी घेतली होती. यावेळी विक्रम लँडरच्या मागे, पुढे आणि वरील बाजूस अँटेना जोडण्यात आले आहेत. त्यामुळे लँडर मॉड्युलच्या स्थितीच्या प्रत्येक क्षणाचे अपडेट नियंत्रण कक्षाला मिळत होते.

भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी अभिमानाची आणि गौरवाची बातमी समोर आली आहे. इस्त्रोचं ‘चांद्रयान ३’ आज (२३ ऑगस्ट) संध्यााकाळी ६ वाजून ४ मिनीटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या लँड झालं आहे. यामुळे देशातील १४० कोटी भारतीयांना उर अभिमानाने भरून आला आहे. ‘चांद्रयान ३’ चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग यशस्वीरित्या पडल्याने भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातला पहिला देश ठरला आहे.

‘चांद्रयान 3’ चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्विरित्या लँड झाल्याने भारतीयांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. १४ जुलै रोजी पृथ्वीवरुन चंद्राच्या दिशेने निघालेल्या ‘चांद्रयान ३’ चा पृथ्वी ते चंद्र हा प्रवास यशस्वी झाला आहे. भारताच्या चांद्रमोहिमेकडे संपूर्ण जागाचं लक्ष लागून होतं. यामुळे प्रत्येक भारतीयाची छाती अभिमाने फुलुन गेली आहे.

इस्त्रोला गेल्या दोन मोहिमेत अपयशाचा सामना करावा लागला होता. मात्र भारतानं हार न मानता आपले प्रयत्न सुरु ठेवले. ‘चांद्रयान ३’ मोहिमेला २०२० मध्ये सुरुवात करण्यात आली होती. भारताचं चंद्रावर जाण्याचं स्वप्न आज अखेर पूर्णत्वास आलं आहे. आंध्र प्रदेशाच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून १४ जूलैला दुपारी २.३५ वाजता ‘चांद्रयान ३’ ने यशस्वी उड्डाण केलं होतं आणि आज हे यान चंद्रावर जाऊन पोहचलं आहे.

भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवण्यास यशस्वी झाल्याने दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला देश ठरला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कायम अंधार असतो. तसंच या ठिकाणचं वातावरण अत्यंत थंड असल्याचं सांगितलं जातं. भारताच्या ‘चांद्रयान १’ ने चंद्रावर बर्फाचा शोध लावला होता. आता चंद्रावर पाण्याचे साठे शोधणं हे ‘चांद्रयान ३’ चं प्रमुख उद्दिष्ट आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरील विविध नमुने गोळा करून इस्रत्रो त्यावर संशोधन करणार आहे.

हे आहेत भारताच्या चांद्र मोहिमेचे हिरो

चंद्रावर यशस्वी लँडिंग करण्यासोबतच भारताने इतिहास रचला. चांद्रयान ३ आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरले. देशभरात चांद्रयान ३च्या यशाचा जल्लोष सुरू आहे. संपूर्ण देश आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था गेल्या चार वर्षांपासून या अभिमानास्पद क्षणाची वाट पाहत होते.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. यामागे इस्त्रोच्या टीमची भरपूर मेहनत आणि चिकाटी आहे. त्यांनी गेली चार वर्षे इतकी प्रचंड मेहनत केली की त्यामुळेच आजचा हा सोनेरी दिवस सगळ्यांना दिसत आहे. गेल्या चार वर्षांपासून त्यांच्या आयुष्यात चांद्र मोहीम फत्ते करणे इतकेच ध्येय होते. जाणून घ्या हे चेहरे यांनी ही मोहीम यशस्वीपणे राबवली.

डॉ. एस सोमनाथ इस्रो प्रमुख

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस सोमनाथ यांच्या नेतृत्वात चांद्रयान ३ ही मोहीम यशस्वी झाली. यही मोहीम यशस्वी झाल्यानंतर ते म्हणाले, मी सर्व भारतीय आणि त्या सर्वांचे आभार मानतो ज्यांनी आमच्यासाठी प्रार्थना ेली. मी किरण कुमार सर, श्री कमलाधर, कोटेश्वर राव यांचे आभार मानतो. ते खूप मदत करत आहेत आणि संघाचा भागही आहेत. आम्हाला संघातील सर्व सहकाऱ्यांकडून विश्वास मिळाला. एअरोस्पेस इंजीनिअर डॉ एस सोमनाथ यांनी व्हीकल मार्क ३ डिझाईल केले ज्याला बाहुबली रॉकेट म्हटले जाते. बाहुबली रॉकेटने चांद्रयान ३ला चंद्राच्या कक्षेत पोहोचवले.

एम शंकरन – यू आर राव सॅटेलाईट सेंटरचे संचालक

चांद्रयान ३च्या यशस्वी लँडिंगनंतर भारताच्या सर्व उपग्रहांचे डिझाईन निर्माण करणाऱ्या टीमचे नेतृत्व करणार एम शंकरन म्हणाले, चार वर्षांपासून आम्ही याच मिशनसाठी जगत आहोत. खाताना, पिताना, झोपताना केवळ याच मोहिमेचा विचार. यासाठी इस्रोच्या टीमने जे प्रयत्न केलेत ते कल्पनाशक्तीच्या बाहेरचे आहे. भविष्यात आम्ही शुक्र, मंगळावर जाण्याचा प्रयत्न करू.

कल्पना के – चांद्रयान ३ मोहिमेच्या डेप्युटी प्रोजेक्ट डायरेक्टर

चांद्रयान ३च्या यशस्वी लँडिंगनंतर इस्त्रोच्या प्रमुखांसोबत दुसरा चेहरा दिसला तो म्हणजे या चांद्रयान ३ मोहिमेच्या डेप्युटी प्रोजेक्ट डायरेक्टर कल्पना के. त्या देशाच्या नारीशक्तीचे प्रतीक बनल्या आहेत. कोरोना काळातही त्यांनी चांद्र मोहिमेचे स्वप्न काही सोडले नव्हते. गेल्या चार वर्षांपासून त्या दिवस रात्र या मोहिमेवर काम करत आहेत.

पी वीरमुथुवेल – चांद्रयान ३चे प्रोजेक्ट डायरेक्टर

पी वीरमुथुवेल यांनी २०१९मध्ये चांद्रयान ३च्या परियोजन डायरेक्टच्या रूपात कार्यभार सांभाळला होता. याआधी त्यांनी इस्रोच्या मुख्य कार्यालयात स्पेस इन्स्फ्रास्ट्रक्चर प्रोग्राम कार्यालयात उप संचालकपद सांभाळले होते.

एस उन्नीकृष्णन नायर – विक्रम साराभाई अंतराळ केंद्रचे संचालक

एअरोस्पेस इंजीनियर डॉ. उन्नीकृष्णन अंतराळात भारताच्या मानव मोहीमेचे नेतृत्व करत आहे. ते रॉकेटचा विकास आणि निर्मितीशी संबंधि विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक आहेत. त्यांच्याकडे केरळच्या थुम्बास्थित विक्रम साराभाई अंतरा केंद्र, जिओसिंक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हेईल मार्क ३ विकसित करण्याची जबाबदारी होती.

कसा होता…? चांद्रयान-३ चा ४० दिवसांचा प्रवास…
  • ५ जुलै : चांद्रयान-३ ला अंतराळात नेणाऱ्या LVM-३ रॉकेटशी जोडण्यात आले. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात प्रक्षेपणाची तयारी सुरू
  • ६ जुलै : इस्रो (ISRO) ने मिशन चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणाची तारीख जाहीर केली.
  • ११ जुलै : चांद्रयान-३ ची ‘लाँच रिहर्सल’ करण्यात आली. इस्रोकडून चांद्रयान-३ प्रक्षेपणाची तालीम पूर्ण.
  • १४ जुलै : लाँच व्हेईकल मार्क-III (LVM-३) म्हणजेच ‘बाहुबली रॉकेट’ द्वारे चांद्रयान-३चे श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून २.३५ वाजता यशस्वी प्रक्षेपण.
  • १५ जुलै : LVM ३-M4 रॉकेटने चांद्रयान-३ योग्य कक्षेत पोहोचवले. चांद्रयान-३ ने ४१७६२ किमी x १७३ किमीची कक्षा गाठली. चांद्रयान-३ ने चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला.
  • १७ जुलै : चांद्रयान-३ हे ४१६०३ किमी x २२६ किमीच्या दुसऱ्या कक्षेत पोहोचलं.
  • २२ जुलै : चांद्रयान-३ ने चौथ्या कक्षेत प्रवेश केला. अंतराळयान ७१३५१ किमी x २३३ किमीच्या कक्षेत पोहोचले.
  • २५ जुलै : चांद्रयान-३ ला पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर काढण्यासाठी बुस्टिंग करण्यात आले. निर्धारित वेळेत चांद्रयान-३ चे इंजिन चालू करण्यात आले. त्यानंतर या यानाला पुरेसा वेग देऊन त्याला चंद्राच्या दिशेने पाठवण्यात आले.
  • १ ऑगस्ट : चांद्रयान-३ ट्रान्सलुनर कक्षेत (२८८ किमी x ३६९३२८ किमी) पोहोचलं.
  • ५ ऑगस्ट : चांद्रयान-३ ने यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत (१६४ किमी x १८०७४ किमी) प्रवेश केला.
  • ६ ऑगस्ट : अखेर चंद्राचे दर्शन झाले! चांद्रयान-३ यानाने चंद्राचा पहिला फोटो पाठवला.
  • ६ ऑगस्ट : चांद्रयान-३ चंद्राच्या दुसऱ्या कक्षेत दाखल झाले. ६ ऑगस्ट २०२३ रोजी यान १७० x ४३१३ किमी कक्षेत पोहोचले.
  • ९ ऑगस्ट : चांद्रयान-३ चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत यशस्वीरित्या पोहोचले. चांद्रयान-३ ने ९ ऑगस्ट रोजी दुपारी १.४० वाजता कक्षा बदलली.
  • 10 ऑगस्ट : चांद्रयान-३ ने पृथ्वी आणि चंद्राचे फोटो पाठवले.
  • १४ ऑगस्ट : चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागाजवळ पोहोचले. यानाने १५० किमी x १७७ किमीवर चौथ्या कक्षेत प्रवेश केला.
  • १६ ऑगस्ट : अंतराळयानाने १६३ किमी x १५३ किमीची चंद्राची पाचवी आणि अंतिम कक्षा गाठली.
  • १७ ऑगस्ट : चांद्रयान-३ मधील विक्रम लँडर मॉड्यूल प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीरित्या वेगळे झाले.
  • १८ ऑगस्ट : चांद्रयान -३ चंद्राच्या ११३ किमी x १५७ किमी कक्षेत पोहोचलं. विक्रम लँडरचा वेग कमी करण्याची डिबूस्टिंग प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. चांद्रयान-३ चंद्रापासून ३० किमी अंतरावर पोहोचले.
  • २० ऑगस्ट : चांद्रयान-३ चंद्राच्या १३४ किमी x २५ किमी कक्षेत पोहोचण्यासाठी डिबूस्टिंग प्रक्रियेद्रवारे विक्रम लँडरचा वेग पुन्हा कमी करण्यात आला आणि चांद्रयान-३ चंद्रापासून २५ किमी अंतरावर पोहोचले.
  • २१ ऑगस्ट : चांद्रयान-२ आणि चांद्रयान-३ चा एकमेकांशी संपर्क झाला. इस्रोची चांद्रयान-२ मोहीम अयशस्वी ठरली तरी, चांद्रयान-२ चं ऑर्बिटर अद्यापही अवकाशात चंद्राला प्रदक्षिणा घालत आहे.

२३ ऑगस्ट : चांद्रयान-३ चा वेग आता हळूहळू कमी करीत चांद्रयान- ३ हे २३ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यात यशस्वी झाले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान -३ उतरवणारा भारत जगात पहिला देश ठरला.

३.८४ लाख किलोमीटरचा प्रवास
भारताची अंतराळातील महात्वाकांक्षी मोहीम चांद्रयान-३ ने १४ जुलै २०२३ पासून पृथ्वीपासून चंद्रापर्यंतच्या प्रवासाला सुरुवात झाली. चांद्रयान-३ ला पृथ्वीपासून चंद्रापर्यंत पोहचण्यासाठी ३.८४ लाख किलोमीटरचा प्रवास करावा लागला. इतका मोठा प्रवासाचा पल्ला गाठल्यानंतर चांद्रयाण -३ आज बुधवारी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी यशस्वीरित्या चंद्रावर उतरले आणि ही महत्वाकांक्षी मोहीम पूर्ण झाली. चंद्राच्या पृष्ठभागावर या यानाला ४० दिवसांचा प्रवास करावा लागला.