राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मोर्चाला सामोरे जाण्यास सज्ज

दादाजी भूसे, अतुल सावे या दोन मंत्र्यांवर मोठी जबाबदारी

मुंबई,१५ मार्च  /प्रतिनिधी :-शेतकऱ्यांच्या लॉंग मार्च मुंबईत दाखल होत आहे. शेतकऱ्यांच्या या लॉंग मार्चला सामोरे जाण्यासाठी आता राज्य सरकारही तयारी केली आहे. राज्य सरकारमधील शिंदे गटाचे मंत्री दादा भूसे आणि भाजप नेते अतुल सावे यांच्यावर ही जबाबदारी दिली आहे. दादा भूसे आणि अतुल सावे शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहे. शेतकऱ्यांचा लॉंग मार्च मुंबईत येऊ न देता मुंबई बाहेरच चर्चा करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. त्यांच्या या चर्चेतून शेकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा आहोत. त्यांचे म्हणणे आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवू, आणि जर आमच्याशी बोलून त्यांचे समाधान नाही झालं तर त्यांची मुख्यमंत्र्य़ाशी भेट घडवून देऊ, अशी भूमिका मंत्री दादा भूसे यांनी मांडली. किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीसह अन्य शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या शेतकरी लाँग मार्चचा बुधवारी १५ मार्च चौथा दिवस आहे. नाशिकमधून लाखोच्या संख्येने निघालेला हा मोर्चा कधीही मुंबईत दाखल होऊ शकतो. दरम्यान, शेतकऱ्यांचे नेते जीवा पांडू गावीत यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे की, मोर्चा मुंबईकडे कूच करत आहे. जर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी मोर्चा स्थळी यावे.