नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांचे पालकमंत्री

अतुल सावेंकडे जालना- बीड तर गिरीष महाजन यांच्याकडे नांदेड -परभणीची  जबाबदारी 

औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे तर अब्दुल सत्तार यांच्याकडे हिंगोली 

उस्मानाबाद व लातूरची जबाबदारी तानाजी सावंत यांच्याकडे 

मुंबई ,२४ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे  नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.भाजप नेते गिरीश महाजन यांना धुळे,लातूर, नांदेड या तीन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:

राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,

सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,

चंद्रकांत दादा पाटील- पुणे,

विजयकुमार गावित- नंदुरबार,

गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,

गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव

दादा भुसे- नाशिक,

संजय राठोड- यवतमाळ, वाशिम

सुरेश खाडे- सांगली,

संदिपान भुमरे -औरंगाबाद

उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,

तानाजी सावंत-परभणी,उस्मानाबाद

रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,

अब्दुल सत्तार- हिंगोली,

दीपक केसरकर -मुंबई शहर ,  कोल्हापूर,

अतुल सावे – जालना, बीड,

शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,

मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर