दिल्लीकरांच्या नादाला लागून गद्दारी करणाऱ्यांनी शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये-विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा हल्लाबोल


मुंबई ,१२ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- १९९३ मध्ये  दंगल झाली तेव्हा मुंबई शिवसेनेने वाचवली, बाबरी मशीद पडली त्याची जबाबदारी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उचलली होती. त्यामुळे शिवसेनाप्रमुख यांच्या शिवसेनेविषयी बोलण्याचा ती फोडण्याच पाप ज्यांनी दिल्लीकरांच्या नादाला लागून केलं, त्या शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांनी शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये असा हल्लाबोल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांनी पैठण येथील सभेत केलेल्या टीकेवर केल

शिवसेनेच्या हिंदुत्वावर शिंतोडे उडवण्याच पाप तुम्ही करताय आणि आज जाहीर सभेत ते कबूल केलं. ज्या पद्धतीने दिल्लीकरांपुढे झुकून महाराष्ट्राच अपमान करत आहात. ज्या दिल्लीकरांनी शिवसेना तोडली ते जर तुमचे आदर्श होत असतील तर ते तुम्हाला लखखाट होवो असा घणाघात दानवे यांनी मुख्यमंत्री शिंदेवर केला.

मराठवाड्यात येऊन मुक्तीसंग्रामाचा इतिहास विसरले, विकासाबाबत एक शब्दही काढला नाही, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे मराठवाड्याच्या विकासाला छेद देण्याच काम करत असल्याचा आरोप दानवे यांनी केला.

सामनाने भल्याभल्यांची वाट लावली
सामना वर्तमानपत्रातील अग्रलेख व बातमी यांची देशपातळीवर दखल घेतली जाते. सामनामध्ये आलेल्या बातमीने भल्याभल्यांची वाट लावली.
त्यामुळे सामना या शिवसेनेच्या मुखपत्रावर टीका करताना संभाळून बोलण्याचा इशारा दानवे यांनी दिला.

उपसा गव्हाण योजनेची चौकशीची मागणी

पैठण येथील सभेत मंत्री संदीपान भुमरे यांनी घोषणा केलेल्या योजना या उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना मंजुरी झाल्या होत्या. आता उपमा गव्हाण योजना घोषित केली ती संकल्पना अप्पा निर्मळ यांची होती, एकप्रकारे भुमरे हे टाळूवरच लोणी खाण्याचं काम करत आहेत. हे कंत्राट त्यांच्या जावई यांना मिळाल्याचं आरोप अंबादास दानवे यांनी करत याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

केंद्रातील मंत्र्यांची दादागिरी प्रकरणी फडणवीस शिंदे सरकार बरखास्त करावे- अंबादास दानवे

केंद्रातील मंत्री नारायण राणे हे थेट दादागिरी करत धमकी देत आहेत. शिंदे फडणवीस यांचं सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालून दादागिरी करत उघडपणे धमक्या देत फिरत असतील तर अशा दादागिरी करणारे सरकार बरखास्त करण्यात यावे ही आमची आणि सामान्य जनतेची मागणी असल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादात आमदार सदा सरवणकर यांच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. अशा आमदाराला माझा मित्र असल्याचे म्हणत केंद्रातील मंत्री भेटत असतील आणि मुंबई व महाराष्ट्रात फिरायचं आहे ना अशा धमक्या देत असतील तर राज्यातील
हे सरकार गुंडांचं सरकार आहे का असा सवाल करत दानवे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
मुंबई व महाराष्ट्र शिंदे भाजप यांना आंदण म्हणून दिल आहे का असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
गृहमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत, ते जर राज्यात कायदा व सुव्यस्था राखू शकत नसतील आणि अशाप्रकारे गुंडगिरी व दादागिरी होत असेल तर अशा सरकार ला सत्तेत राहण्याचा अधिकार नसल्याचा दानवे म्हणाले.