जयश्री जाधव यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

मुंबई,११ मे /प्रतिनिधी :-कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातील  पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव या निवडून आल्या असून त्यांचा शपथविधी सोहळा विधानभवन येथे आज झाला. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी श्रीमती जाधव यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदामंत्री जयंत पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार नाना पटोले, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत तसेच संबंधित अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.