राजर्षि शाहू महाराज चरित्र साधने प्रकाशन समितीचे पुनर्गठन; सदस्य सचिवपदी विजय चोरमारे

मुंबई,२० एप्रिल  /प्रतिनिधी :- महाराष्ट्राच्या वैचारिक, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक बांधणीत राजर्षि शाहू महाराज यांचे मोलाचे योगदान आहे. राज्याच्या पुरोगामित्वाची जडणघडण करण्यास प्रेरणादायी ठरलेल्या या आदिनेत्याची ओळख जागविण्यासाठी विशेष कृती प्रकल्प हाती घ्यावा, या उद्देशाने राजर्षि शाहू महाराज चरित्र साधने प्रकाशन समितीची स्थापना करण्यात आली होती.

आगामी काळात राजर्षि शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित इतर साहित्याचे संकलन, संपादन, प्रकाशन करण्याकरिता शाहू महाराज चरित्र साधने प्रकाशन समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हे या समितीचे अध्यक्ष, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री हे उपाध्यक्ष, तर सदस्य सचिव म्हणून डॉ. विजय चोरमारे, मुंबई हे आहेत. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, निमंत्रक म्हणून संचालक, उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे हे असतील.

संचालक, शासकीय मुद्रणालय, लेखा सामग्री व प्रकाशन, मुंबई, डॉ.प्रकाश पवार, कोल्हापूर, रमेश चव्हाण, पुणे, डॉ.रविंद्र रुक्मिणी पंढरीनाथ, वर्धा, डॉ. सोनाली रोडे, सहसंचालक, उच्च शिक्षण, मुंबई विभाग, डॉ.शैलेद्र खरात, पुणे, डॉ. मंजुश्री जयसिंगराव पवार, कोल्हापूर, श्री. प्रभाकर अश्रोबा ढगे, गोवा, डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर, सातारा, डॉ. दत्ता पवार, मुंबई, डॉ. नारायण भोसले, मुंबई, प्रा.राजेश्वरी देशपांडे, राज्यशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, राम जगताप, ठाणे, राजेंद्र साठे, मुंबई, डॉ. राजहंस कपील अनारपिंड, कोल्हापूर, हे सदस्य असतील.

राजर्षि शाहू महाराज चरित्र साधने प्रकाशन समितीची मुदत प्रारंभी तीन वर्षापर्यंत राहील, असेही या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे.