मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई, ३ऑगस्ट /प्रतिनिधी :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुख्यमंत्री अभिवादनात म्हणतात, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ब्रिटीशांच्या अराजकला, जुलमांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले. ते सत्यशोधकी विचारांचे होते. त्यांनी सामाजिक सुधारणांचाही आग्रह धरला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी खासदार म्हणून लोकसभेत मराठीचा दमदार आवाज घुमवला. अन्याया विरोधात करारी आणि वंचितांप्रति कनवाळू असा त्यांचा बाणा होता. महाराष्ट्रसुपुत्र क्रांतीसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.