राज्याचे माजी पोलीस महासंचालक सुबोधकुमार यांची CBI संचालकपदावर नियुक्ती

नवी दिल्ली, 25 मे: राज्याचे माजी पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांची सीबीआयच्या महासंचालकपदावर वर्णी लागली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सीबीआयचे प्रमुखपद हे रिक्त होते अखेर त्या जागेवर सुबोधकुमार जयस्वाल यांची निवड करण्यात आली आहे.सुबोधकुमार यांच्या कारकीर्दीची सुरुवात औरंगाबाद शहरातूनच झाली. ते एन दंगलीच्या काळात औरंगाबाद शहरात कार्यरत होते.

दोन वर्षांसाठी सुबोधकुमार जयस्वाल यांची सीबीआयच्या संचालकपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सुबोधकुमार जयस्वाल हे 1985 च्या बॅचचे पोलीस अधिकारी आहेत. त्यांचे नाव सीबीआय महासंचालक पदासाठी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कठित सोमवारी एका उच्चस्तरीय समितीने सीबीआयच्या महासंचालकपदासाठी काही नावांची यादी तयार केली होती. या यादीमध्ये सीआयएसएफचे महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, सशस्त्र सीमा बलचे महासंचालक कुमार राजेश चंद्रा आणि केंद्रीय गृह मंत्रालयात विशेष सचिव असलेले व्ही. एस. के.य कौमुडी यांच्या नावाचा समावेश होता.

सोमवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या झालेल्या निवड मंडळाच्या बैठकीत सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांनी नियमावर बोट ठेवल्याने, दोन नावे आपोआपच बाजूला पडली. त्यामुळे आता या पदासाठी केवळ तीन नावांचाच विचार केला जाणार होता.

सुमारे दीड तास चाललेल्या या बैठकीत पंतप्रधान मोदी, सरन्यायाधीश रमण आणि विरोधी पक्षातील नेते अधीररंजन चौधरी उपस्थित होते. महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, सशस्त्र सीमा दलाचे महासंचालक के. आर. चंद्र आणि गृह मंत्रालयाचे विशेष सचिव व्ही. एस. के कौमुदी यांच्या नावावर चर्चा झाली. सरन्यायाधीशांनी बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचे उदाहरण देत, सहा महिन्यांचा नियम समोर केला. ज्या अधिकार्‍यांच्या सेवाकाळ सहा महिन्यांपेक्षा कमी उरला आहे, त्यांच्या नावाचा विचार सीबीआय संचालकपदासाठी केला जाऊ नये, असा हा निकाल होता. अधीररंजन चौधरी यांनी रमण यांच्या भूमिकेचे समर्थन केले. या नियमामुळे शर्यतीत असलेले सीमा सुरक्षा दलाचे राकेश अस्थाना आणि एनआयएचे वाय. एस. मोदी यांचे नाव यादीतून बाहेर झाले. अस्थाना 31 ऑगस्टला व मोदी 31 मे रोजी निवृत्त होत आहेत.