हिंगोली तालुक्यातील कलगांव व सिरसम आणि वसमत नगरपरिषदेतील प्रभाग क्र.03 कंटेनमेंट झोन घोषीत

हिंगोली,दि.11: हिंगोली तालुक्यातील कलगांव आणि सिरसम तसेच वसमत तालुक्यातील नगर परिषद प्रभाग क्र.3 कुरेशी मोहल्ला येथे कोविड-19 चे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव होवू नये म्हणून कलगांव आणि सिरसम या गावाचे संपूर्ण क्षेत्र तसेच वसमत नगरपरिषदेतील प्रभाग क्र. 3, कुरेशी मोहल्ला कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

या परिसरातील नागरिकांच्या हालचालींवर बंधने घालण्यात आली आहेत. या परिसरातील सर्व आवश्यक त्या सेवा या आदेशान्वये बंद करण्यात आल्या आहेत. नागरिकांना आवश्यक त्या सेवा ग्रामपंचायत मार्फत वेळोवेळी आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) चे कलम 188 व साथरोग कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *