कोरोनाची दुसरी लस; आरोग्यामंत्र्यावर टीकेचा भडिमार, अखेर राजेश टोपेंनी सोडलं मौन

मुंबई,१८मे /प्रतिनिधी :-  दोन लसीकरणाच्या मात्रा घेण्यासाठीचा कालावधी वाढविला गेला आहे. या कारणावरुन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर टीका केली जात आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज लस घेतली. त्यानंतर सोशल मीडियावर यावरून टोपे विरोधात नाराजी सुरू झाली आहे. एक महिन्याचा कालावधी पू्र्ण होताच दुसरी लस कशी घेतली? म्हणून प्रश्न उपस्थितीत केले जात आहे. प्रोटोकॉलनुसार लस घेण्यासाठीचा कालावधी नव्या बदलानुसार साधारण तीन महिने करण्यात आला आहे. परंतू त्याआधीच आरोग्यमंत्री लस कसे घेतात, असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे. याबाबत टोपे यांच्या कार्यालय याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की, आरोग्यमंत्री यांनी कोव्हीशिल्ड नाही तर कोव्हॅक्सिन लस घेतली यामुळे 30 दिवस कालावधी नंतर दुसरी लस घेतली.