आनंदाची बातमी :आशा कार्यकर्ती ताईंसाठी आमदार चौगुले यांनी दिले एक महिन्याचे वेतन

उमरगा ,१३ मे /प्रतिनिधी :-
उमरगा-लोहारा तालुक्यातील सर्व आशा कार्यकर्ती  ताईंना, आमदार ज्ञानराज चौगुले यांनी  एक महिन्याचे वेतन व ग्रामनिधी मधून ५०० असे प्रत्येकी 1000 रु. प्रोत्साहनपर मानधन देण्याचे ठरले आहे . 
उमरगा व लोहारा तालुक्यात सुमारे 300 आशा ताई व 15 गट प्रवर्तक कार्यरत आहेत. गावातील विविध आरोग्यविषयक सर्व्हेची कामे त्यांच्यामार्फत करून घेतली जातात. याशिवाय अनेक शासकीय आरोग्यविषयक उपक्रमांत त्यांचा सहभाग असतो. सध्याच्या कोरोना आजाराच्या गंभीर परिस्थितही  अविरतपणे सेवा देत आहेत. त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण असूनही शासनाकडून अत्यन्त कमी मानधन देण्यात येते, ही बाब लक्षात घेऊन आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सर्व आशा ताईंसाठी आपले 1 महिन्याचे वेतन देण्याचा निर्णय घेतला होता.
यानुसार या सर्व आशा कार्यकर्ती व गटप्रवर्तक यांना आमदार चौगुले यांच्याकडून प्रत्त्येकी 500 व  प्रत्येक ग्रामपंचायतींच्या ग्राम निधीतून 500 असे एकूण 1000 रुपयांचे प्रोत्साहनपर मानधन देण्याचा निर्णय गटविकास अधिकारी उमरगा व लोहारा यांच्याशी चर्चा करून घेण्यात आला. 
यानुसार आज त्यांनी उमरगा व लोहारा तालुक्यातील आशा कार्यकर्त्यांसाठी आपले 1 महिन्याचे वेतन गटविकास अधिकारी, उमरगा व लोहारा यांच्याकडे सुपूर्द केले.यावेळी युवा नेते किरण गायकवाड, गटविकास अधिकारी उमरगा कुलदीप कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास साळुंके, उमरगा-लोहारा तालुका आशा महासंघाच्या अध्यक्षा सुरेखा ठाकूर, सुनीता शिदोरे, श्रीमती स्वामी बी.सी. -गटप्रवर्तक  प्रा.आ.केंद्र मुळज,श्रीमती नंदगुरे एस. एच – गटप्रवर्तक प्रा.आ.केंद्र मुळज,श्रीमती लक्ष्मी लोहार – आशा स्वयंसेविका मुळज,श्रीमती वनिता गायकवाड – आशा स्वयंसेविका दाबका,श्रीमती सुमन जाधव -आशा स्वयंसेविका गुंजोटी,श्रीमती आशा पाटील – आशा स्वयंसेविका कडदोरा आदी उपस्थित होते.