महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ

राज्यात दिवसभरात कोरोनाच्या ७७ हजारांहून अधिक चाचण्या
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासन आणि प्रशासन सज्ज

मुंबई : महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ पाहायला मिळाली आहे. एका दिवसामध्ये कोरोनाचे १२,८२२ रुग्ण सापडले आहेत. तसंच २७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ५,०३,०८४ एवढी झाली आहे. यापैकी १,४७,०४८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे, तर ३,३८,२६२ रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या एका दिवसात ११,०८१ रुग्ण घरी सोडण्यात आले. 

राज्यामध्ये कोरोना रुग्णांचा बरे होण्याचा दर हा ६७.२६ टक्के एवढा आहे, तर मृत्यूदर ३.४५ टक्के आहे. राज्यामध्ये आत्तापर्यंत केलेल्या एकूण टेस्टपैकी १९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. 

राज्यामध्ये मुंबईत सर्वाधिक १,२२,३१६ कोरोनाग्रस्त आहेत. यापैकी ९५,३५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर १९,९१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईमध्ये आत्तापर्यंत ६,७५१ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई पाठोपाठ पुणे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या १,०९,९८८ एवढी आहे. यापैकी ६६.०८९ रुग्ण बरे झाले आहेत, तर ४१,२६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यामध्ये सध्या पुण्यात सर्वाधिक ऍक्टिव्ह केस आहेत. पुण्यात आत्तापर्यंत २,६३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 

आज निदान झालेले १२,८२२ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २७५ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१३०४ (५८), ठाणे- २३२ (६), ठाणे मनपा-३०४ (१५),नवी मुंबई मनपा-४६६ (६), कल्याण डोंबिवली मनपा-३७७ (१२),उल्हासनगर मनपा-४२, भिवंडी निजामपूर मनपा-२२, मीरा भाईंदर मनपा-२२२ (९),पालघर-१५७ (५), वसई-विरार मनपा-२१७ (९), रायगड-२३७ (१३), पनवेल मनपा-१६४ (४), नाशिक-१४७(५), नाशिक मनपा-५८९ (३), मालेगाव मनपा-५४,अहमदनगर-३४२ (२),अहमदनगर मनपा-२६५, धुळे-१३९ (१), धुळे मनपा-२०१ (७), जळगाव-४६३ (२), जळगाव मनपा-१९३, नंदूरबार-१५६, पुणे- ४३७ (८), पुणे मनपा-१४७५ (३९), पिंपरी चिंचवड मनपा-८९० (२०), सोलापूर-३९६ (६), सोलापूर मनपा-४१ (१), सातारा-१८८ (१), कोल्हापूर-३१४ (८), कोल्हापूर मनपा-२०६ (१), सांगली-७५ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-१७७ (४), सिंधुदूर्ग-१४, रत्नागिरी-८ (४), औरंगाबाद-१८७, औरंगाबाद मनपा-१६६ (२), जालना-२०२ (६), हिंगोली-६, परभणी-४८, परभणी मनपा-२७, लातूर-१२१ (१), लातूर मनपा-१०४, उस्मानाबाद-१९६ (१), बीड-१०७ (३), नांदेड-१२२, नांदेड मनपा-१, अकोला-१८, अकोला मनपा-९ (१), अमरावती-३१, अमरावती मनपा-७०, यवतमाळ-९२ (२), बुलढाणा-१०७, वाशिम-४९, नागपूर-१४३ (१), नागपूर मनपा-३७१ (५), वर्धा-२, भंडारा- ३९, गोंदिया-४१, चंद्रपूर-८, चंद्रपूर मनपा-८, गडचिरोली-३४, इतर राज्य १७.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २६ लाख ४७ हजार ०२० नमुन्यांपैकी ५ लाख ०३ हजार ०८४ नमुने पॉझिटिव्ह (१९ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ८९ हजार ६१२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ६२५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २७५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४५ टक्के एवढा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *