आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023 ची सुरुवात

मोठ्या प्रमाणावर भरड धान्य लागवडीला आणि वापराला प्रोत्साहन देणे आणि आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष (IYM)च्या माध्यमातून ते संपूर्ण जगासमोर आणण्याचे कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग(DA&FW) चे उद्दिष्ट आहे. केंद्रीय मंत्रालये, राज्ये आणि भारतीय दूतावास आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाच्या प्रचारासाठी आणि भरड धान्यांच्या फायद्यांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी तसेच विविध उपक्रम  राबविण्यासाठी वर्ष 2023 मध्ये संपूर्ण एक महिना  लक्ष केंद्रित करणार भारत सरकारच्या क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालय आणि छत्तीसगड, मिझोराम आणि राजस्थान राज्यांसाठी आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षासाठी (IYM) विविध कार्यक्रम/उपक्रम आयोजित करण्यासाठी जानेवारी 2023 हा केंद्रित उपक्रमांचा  महिना म्हणून निश्चित करण्यात आला आहे. नवी दिल्ली,१ जानेवारी  / प्रतिनिधी :- पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली, भारत सरकारकडून आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष (IYM) 2023 चा प्रस्ताव मांडण्यात आला होता जो संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने (UNGA) स्वीकारला होता. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे करत असताना भारत सरकारला आघाडीवर ठेवण्यासाठी ही घोषणा महत्त्वपूर्ण ठरली आहे. भारताचे पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी देखील भारत हे भरड धान्याचे जागतिक केंद्र असल्याचे दर्शवत, आय वायएम (IYM) 2023 ला ‘लोक चळवळ’ बनवण्याचा त्यांचा दृष्टीकोन स्पष्ट केला आहे. सिंधू संस्कृतीच्या काळात भरड धान्ये ही पिके अन्न म्हणून वापरात आलेली पहिले पीके होती हे अनेक पुराव्यांसह स्पष्ट झाले आहे. सध्या 130 हून अधिक देशांमध्ये भरड धान्ये पिकवली जात  असल्याने आशिया आणि आफ्रिकेतील अर्ध्या अब्जाहून अधिक लोकांसाठी बाजरी हे पारंपरिक अन्न मानले जाते. भारतात, भरड धान्ये ही प्रामुख्याने खरीप पीके आहेत, ज्यांना इतर तत्सम मुख्य पिकां पेक्षा कमी पाणी आणि कृषी निविष्ठांची आवश्यकता असते. भरड धान्ये ही जगभर उपजीविका निर्माण करण्याच्या, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या आणि अन्न आणि पौष्टिक मूल्यांची  सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या त्याच्या प्रचंड क्षमतेमुळे महत्त्वाची आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या(UN) अनेक शाश्वत विकास उद्दिष्टांना (SDGs) अनुसरून असलेल्या भरड धान्यांच्या प्रचंड क्षमतेला विचारात घेऊन, भारत सरकारने (GoI) भरड धान्यांना प्राधान्य दिले आहे.  एप्रिल 2018 मध्ये, भरड धान्यांचे “न्यूट्री सीरिअल्स” म्हणून पुनर्नामकरण करण्यात आले, त्यानंतर 2018 हे वर्ष भरड धान्ये राष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित करण्यात आले, ज्याचा उद्देश मोठ्या  प्रमाणावर प्रोत्साहन आणि मागणी निर्माण करणे आहे. वर्ष 2021-2026 दरम्यानच्या अंदाज कालावधीत जागतिक भरड धान्य बाजाराचा कंपाउंड     ऍन्युअल ग्रोथ रेट CAGR 4.5% राहण्याचा अंदाज आहे.

Read more