आयएनएस हंसाने साजरा केला हिरक महोत्सव

नवी दिल्ली,५ सप्टेंबर /प्रतिनिधी :- भारतीय नौदलाचा प्रमुख हवाई तळ आयएनएस हंसा, 5 सप्टेंबर 2021 रोजी आपला हिरक महोत्सव साजरा करीत आहे. 1958 मध्ये कोइम्बतूर येथे सी हॉक, अलिझ आणि व्हँपायर विमानांसह उभारण्यात आलेले नेव्हल जेट फ्लाइटनंतर 5 सप्टेंबर 1961 रोजी आयएनएस हंसा म्हणून कार्यान्वित झाले. गोवा मुक्तीनंतर, एप्रिल 1962 मध्ये दाबोळी हवाई क्षेत्र नौदलाने ताब्यात घेतले आणि जून 1964  मध्ये आयएनएस हंसा दाबोळीमध्ये स्थालांतरित करण्यात आले.  केवळ काही विमानांसह एक माफक एअर स्टेशन म्हणून कार्यान्वित असलेल्या  आयएनएस हंसाने गेल्या सहा दशकांमध्ये आपला पराक्रम वाढविला आहे आणि सध्या  40 पेक्षा अधिक लष्करी विमानांचे संचालन ते करीत आहे, जे वार्षिक सरासरी 5000  तासांहून अधिक उड्डाण करीत आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे  24X7 पद्धतीने हाताळून हे हवाई तळ नागरी उड्डाणांना देखील पूरक ठरले आहे, एका  वर्षात सरासरी 29000 उड्डाणे झाली आहेत. डॉर्नियर -228 विमानांसह आयएनएस 310 `कोब्रा`, आयएनएस 315 `विंग्ज स्टॅलियन` या लांब पल्ल्याच्या सागरी गस्ती विमानांसह, आयएल – 38 एसडी, आयएनएस 339 `फाल्कन्स` या विमानासह INAS 303

Read more