कोटींचा अपहार:दंड २१ हजार रुपये; बीड जिल्हा परिषदेने अहवाल सादर करावा-औरंगाबाद खंडपीठाचे आदेश 

औरंगाबाद,१० जानेवारी / प्रतिनिधी :-  चौदाव्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीतून कोट्यवधींचा अपहार केल्याप्रकरणी मंगळवारी खंडपीठापुढे सुनावणी झाली. जनहित याचिका दाखल करण्यासाठी एक लाख रुपये खंडपीठात जमा केले, परंतु बीड जिल्हा परिषदेने तिंतरवणीचे तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकांना केवळ २१ हजार ५३४ रुपयांचा दंड करून अप्रत्यक्षरीत्या कारवाईपासून दूर ठेवल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर न्या. रवींद्र घुगे व न्या. संजय देशमुख यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण चौकशी व कारवाई केल्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी तिंतरवणीचे (ता. शिरूर कासार) २०१७ ते २०२२ या कालावधीत उपसरपंच म्हणून काम केलेले मच्छिंद्र बालू शिंगाडे यांनी ॲड. श्रीकांत कवडे यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील यापूर्वीच्या सुनावणीवेळी बीड जिल्हा परिषदेला नोटीसही बजावण्यात आली होती. तिंतरवणीचे तत्कालीन सरपंच

Read more