देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे कोविड-19 लसीकरण

औरंगाबाद,२८ ऑक्टोबर /प्रतिनिधी:-देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात 27 ऑक्टोबर रोजी उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाचे लसीकरण करण्यात आले. शासन् निर्देशनानुसार महाविद्यालय नियमित स्वरुपात चालू करण्यासाठी विद्यार्थी व  शिक्षकांचे 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी लसीकरण केंद्र आयोजित करण्यात  आले होते. लसीकरण केंद्राचे उदघाटन् डॉ. महेश शिवणकर (सहसंचालक, तंत्रशिक्षण  संचालनालय, औरंगाबाद), प्राचार्या गणोरकर (शासकीय तंत्रनिकेतन्, औरंगाबाद) आणि  महाविद्यालयाचे संचालक डॉ. उल्हास शिउरकर यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता  फीत कापून् करण्यात आले. लसीकरण्याची जबाबदारी आरोग्य विभागातर्फे सुनिता नरवडे, सोनाली जाधव (स्टाफ नर्स), पुष्पा शिरसाठ व पुष्पा पैठणे (आशा वर्कर्स) यांनी पार पाडले. या लसीकरणासाठी मोठया संख्येने विद्यार्थी, प्राध्यापक व पालक उपस्थित होते उदघाटन् प्रसंगी सर्व विभागप्रमुख डॉ. सत्यवान् धोंडगे, प्रा. प्रकाश तौर, प्रा. संजय  कल्याणकर, डॉ. गंजेद्र गंधे, डॉ. राजेश औटी, प्रा. रुपेश रेब्बा, प्रा. अमर माळी व विदयार्थी स्वयंसेवक उपस्थित होते. लसीकरणासाठी सुरक्षित अंतर, मास्क, व सॅनिटायझर या त्रिसुत्रीचा अवलंब करण्यात आला.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सोशल क्लबचे समन्वयक प्रा. भरत पवार, प्रा. विशालसिंह चौहान्, प्रा. किरण बनसोडे, प्रा. सचिन्  अग्रवाल, प्रा. सारिका चव्हाण, प्रा. अमृता आघर्डे, प्रा. अश्विनि गायकवाड, प्रा. विठ्ठल झुंबड, प्रा. आरती वाढेकर,प्रा. रामेश्वर थोटे यांनि परिश्रम घेतले.

Read more