कृषी निर्यातवृद्धीसाठी राज्याचे शेतकरी निर्यात धोरण: औरंगाबाद येथे केशर आंबा व मोसंबी क्लस्टर फॅसिलीटेशन सेल गठीत

औरंगाबाद येथे केशर आंबा व मोसंबी क्लस्टर फॅसिलीटेशन सेल गठीत  सुनील चव्हाण, भा प्र से                            जिल्हाधिकारी, औरंगाबाद,तथा अध्यक्ष, क्लस्टर  फॅसिलिटेशन  सेल.  भाजीपाल्याच्या उत्पादनात भारत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या तर फळांच्या उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र दुर्दैवाने निर्यातीमध्ये २३ व्या क्रमांकावर आहे. उत्पादनात अग्रेसर असलो तरी निर्यातीमध्ये मागे असल्याने हे स्थान अधिक वर नेण्यासाठी कृषि आणि पणन विभाग प्रयत्नशील आहे. निर्यात धोरणातील अनिश्चितता जागतिक बाजारपेठेत अविश्वास निर्माण करते. हे अविश्वासाचे वातावरण कमी करण्यासाठी राज्याचे निर्यात धोरण शेतकरी केंद्रित सर्वसमावेशक आखले आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होईल,          राज्यातील शेतमालाच्या निर्यातीसाठी काही वर्षांपूर्वी सर्वसमावेशक यंत्रणा नव्हती. त्यामुळे निर्यातीच्या सुविधा विस्कळित होत्या. नवे निर्यात धोरण, मॅग्नेट, स्मार्ट प्रकल्पांच्या मोठ्या आर्थिक गुंतवणुकीमुळे निर्यात सुविधा आणि मार्गदर्शन यंत्रणा उभी राहत आहे. याचा फायदा शेतकऱ्यांच्या समूहाला होत आहे. काढणीपश्चात तंत्रज्ञान निर्यात सुविधांच्या अभावामुळे एकूण उत्पादनाच्या २५ टक्के शेतमालाची नासाडी होत आहे. ही आता रोखणे सोपे होणार आहे. निर्यातीवृद्धीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला ४० ते ४५ टक्के अधिकचा दर मिळणे शक्य होणार आहे.”         राज्यातील शेतमालाच्या निर्यातीसाठी कृषी विभाग विविध प्रयोग आणि प्रयत्न करत आहे. यामध्ये विविध पिकांना भौगोलिक मानांकन मिळविणे, रसायनमुक्त आणि सेंद्रिय शेती, फलोत्पादनाला चालना दिली जात आहे. राज्यात फलोत्पादनामध्ये यावर्षी विक्रमी ८० हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. याचा फायदा तीन ते चार वर्षांनी प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाल्यावर होणार आहे. हे उत्पादन निर्यातक्षम होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.          औरंगाबाद हे केशर आंबा व मोसंबीसाठी क्लस्टर फॅसिलिटेशन सेल जाहीर केलेले आहे.या सेलचे अध्यक्ष जिल्हयाचे जिल्हाधिकारीआहेत. केशर आंबा क्लस्टर मध्ये औरंगाबाद,बीड,अहदनगर,नाशिक,लातूर,जालना, परभणी,हिंगोली ,उस्मानाबाद, नांदेड अशा एकूण १० जिल्हांचा समावेश आहे. तसेच मोसंबी क्लस्टर मघ्ये औरंगाबाद , जालना, नागपुर, जळगाव, अमरावती, वर्धा, बीड, नांदेड, परभणी अशा एकूण ९ जिल्हांचा समावेश आहे आहेत. क्लस्टर फॅसिलिटेशन सेलची भुमिका व कार्ये

Read more