मराठवाड्याचा मागासलेपणाचा शिक्का पुसणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

छत्रपती संभाजीनगर,१७ सप्टेंबर /प्रतिनिधी :-  मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी मंत्रीमंडळ बैठकीत ४५ हजार कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचा संकल्प केला आहे,

Read more

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात “नमो 11कलमी कार्यक्रम” राबविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

छत्रपती संभाजीनगर,१७ सप्टेंबर /प्रतिनिधी:-   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त संपुर्ण राज्यात “नमो 11 कलमी कार्यक्रम” राबविण्याचा मंत्रिमंडळाने निर्णय घेतला असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. सुभेदारी विश्रामगृहात माध्यमांशी  संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगभरात भारत देशाचा गौरव व सन्मान  वाढविला आहे.  जी 20 चे अध्यक्षपद भारताला मिळणे ही देशाच्यादृष्टीने गौरवाची बाब आहे. जी 20 ची परिषद राज्यातील अनेक शहरांमध्ये झाली. आपल्या सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती  इतर देशापर्यंत पोहोचविण्याची संधी या परिषदांच्या माध्यमातुन मिळाली. दिल्ली येथे झालेल्या जी 20 च्या बैठकीत प्रधानमंत्री यांनी घेतलेल्या निर्णयांना, ठरावांना विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधानांनी  एकमुखाने संमती दिली. ‘वसुधैव कुटूंबकम’ हा आपला  मुलमंत्र आहे. सबका विकास, सबका साथ, सबका प्रयास, सबका विश्वास या ठरावावरही एकमुखाने शिक्कामोर्तब करण्यात आला असल्याचेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. नमो महिला सशक्तीकरण अभियान नमो 11 कलमी कार्यक्रमात नमो “महिला सशक्तीकरण अभियान” राबविण्यात येणार असुन 73 लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. 40 लाख महिलांना शक्ती गटाच्या प्रवाहात जोडण्यासोबतच 20 लाख नवीन महिलांच्या शक्ती गटाची जोडणी करण्यात येणार आहे. अभियानांतर्गत 5 लक्ष महिलांना रोजगार व तांत्रिक प्रशिक्षण,  5 लाख महिलांना उद्योग उभारणीसाठी भांडवल तसेच 3 लाख महिला उद्योजिकांना बाजारपेठ व ग्राहक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नमो कामगार कल्याण अभियान भारत उभारणीसाठी योगदान देणाऱ्या हातांचा सन्मान म्हणून “नमो कामगार कल्याण अभियान” अंतर्गत 73 हजार बांधकाम कामगारांना सुरक्षा संच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नमो शेततळी अभियान शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढावे यासाठी “नमो शेततळी अभियान” राबविण्यात येणार आहे.  या अभियानांतर्गत 73 हजार शेततळयांची उभारणी करण्यात येणार असुन पडणाऱ्या प्रत्येक पावसाचा थेंब अन् थेंब  याद्वारे साठविण्यात येणार आहे. शेततळयाच्या माध्यमातुन शेतीला मुबलक पाणी उपलब्ध करुन देत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याबरोबरच याच शेततळयातून मत्स्य व्यवसायासारखे शेती संलग्न व्यवसाय उभारण्यावरही भर देण्यात येणार आहे. नमो आत्मनिर्भर व सौर ऊर्जा गाव अभियान “नमो आत्मनिर्भर व सौर ऊर्जा गाव अभियान” राबविण्यात येऊन 73  आत्मनिर्भर गावे विकसित करण्यात येणार आहेत.  बेघरांना किंवा कच्च्या घरात राहणाऱ्यांना पक्के घर बांधुन देणे, घरांमध्ये शौचालय बांधुन त्याचा वापर होण्यासाठी प्रयत्न करणे, पक्क्या रस्त्यांचे जाळे उभारणे, गरजू नागरिकांना गावातच रोजगार उपलब्ध करुन देणे, महिलांचे सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण करणे, पाण्याच्या बाबतीत पूर्णपणे स्वावलंबी बनविणे, दारिद्रय रेषेखालील कुटूंबांना पुर्णपणे आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे, सेंद्रिय शेतीसाठी मार्गदर्शन व साह्य, सेंद्रिय उत्पादनांसाठी विशेष बाजारपेठ, उत्पादन निर्यातीसाठी मार्गदर्शन, उत्पादंनावर प्रक्रियेसाठी मार्गदर्शन व 73 यशस्वी प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव या अभियानातुन करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान अभियान गरीब व मागासवर्गीय वस्त्यांचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी “नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान अभियान” राबविण्यात येणार आहे.  प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून गरीब व मागासवर्गीयांना पक्की घरे बांधुन देण्यात येणार आहेत. तसेच वस्त्यांमध्ये पक्क्या रस्त्यांची उभारणी, घरांमध्ये वीज पुरवठा, समाज प्रबोधनाचे काम व्हावे यासाठी समाज मंदिराची उभारणी, गरीब व मागासवर्गीय महिलांना सामाजिक व आर्थिक सक्षम होण्यासाठीही या अभियानातुन मदत करण्यात येणार आहे. नमो ग्राम सचिवालय अभियान  “नमो ग्राम सचिवालय अभियान” राबवुन प्रत्येक जिल्ह्यात 73 ग्रामपंचायत कार्यालयांची उभारणी करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीमध्ये सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असुन याठिकाणी पूर्णपणे सौर ऊर्जेचा वापर होण्यासाठीचे नियोजन करण्यात येणार आहे. सव ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये वेगवान इंटरनेट सुविधा देण्यात येणार असुन संपुर्ण गावाचे नियंत्रण कक्षाची उभारणीही याद्वारे करण्यात येणार आहे. नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान

Read more

अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा विकासाची मुख्यमंत्र्यांकडून प्रतिज्ञा

छत्रपती संभाजीनगर- हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ सिद्धार्थ उद्यान येथे आयोजित करण्यात आला होता.प्रारंभी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र

Read more

पीएम विश्वकर्मा योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणार – केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

छत्रपती संभाजीनगर,१७ सप्टेंबर /प्रतिनिधी :-  भारताची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना महत्त्वाची ठरणार आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अर्पिता वाघिणीच्या बछड्यांचे नामकरण

छत्रपती संभाजीनगर,१७ सप्टेंबर /प्रतिनिधी :-   सिद्धार्थ उद्यानातील ‘अर्पिता’ या वाघिणीने काही दिवसांपूर्वी बछड्यांना जन्म दिला. या बछड्यांचे नामकरण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते चिठ्ठी

Read more

परळीमधील श्री वैद्यनाथ ज्योतीर्लिंग विकास करण्यासाठी २८६ कोटी ६८ लाखांचा आराखडा मंजूर– कृषिमंत्री धनंजय मुंडे

शानदार सोहळ्यात मुक्तिसंग्राम दिन साजरा; बीडला आता बळ मिळणार – कृषिमंत्री धनंजय मुंडे पैठण उजव्या कालव्यातून माजलगाव धरणात पाणी आणणे

Read more

जालना येथे जलशुध्दीकरण केंद्रासाठी रुपये 56 कोटीचा निधी मंजूर  – पणन मंत्री अब्दुल सत्तार

जालना जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटीबध्द – पणन मंत्री अब्दुल सत्तार जालना,१७ सप्टेंबर /प्रतिनिधी :- हैदराबादच्या मुक्ती लढ्यात जालना जिल्ह्याचे योगदान

Read more

पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी 14 हजार 40 कोटीची योजना राबविण्याचा निर्णय-नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन

बाभळी येथील मध्यम प्रकल्पासाठी 771 कोटी 20 लाख रुपये मंजूर-– नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन छत्रपती संभाजी नगर येथील मंत्रिमंडळ बैठकीत नांदेडसाठी भरीव तरतूद

Read more

पाथरी येथील साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी 91 कोटी – गृहनिर्माण मंत्री अतुल सावे

परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटीबद्ध – गृहनिर्माण मंत्री अतुल सावे परभणी ,१७ सप्टेंबर /प्रतिनिधी :- हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा 75 वा वर्धापन दिन

Read more

हिंगोली येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास छत्रपती संभाजीनगर येथील मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता-रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे

रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण हिंगोली ,१७ सप्टेंबर /प्रतिनिधी :- स्वातंत्र्यानंतरही देशात तीन संस्थाने विलीन

Read more