स्मार्ट इंडिया हॅकेथॉन – २०२२ स्पर्धेत छत्रपती शाहु अभियांत्रिकी महाविद्यालय देशात प्रथम 

औरंगाबाद,११ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-येथील छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्था संचालित छत्रपती शाहूअभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन – २०२२ या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवुन देशात प्रथम  क्रमांक पटकावला.  मानव संसाधन विकास मंत्रालय आणि भारतीय तंत्रशिक्षण परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत महाविद्यालयातील कॉम्पुटर  सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी “जिनिअस नूबस” या टीम अंतर्गतओडिशा येथील  जी. आय. ई. टी. युनिव्हर्सिटी गुणुपुर येथे सहभाग नोंदविला.  स्मार्ट इंडिया हॅकेथॉन ही भारत सरकार, मंत्रालये, विविध  विभाग, उद्योग आणि इतर संस्थांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून  देण्यासाठी शिक्षण मंत्रालयाच्या इंनोव्हेशन सेलचा देशव्यापी उपक्रम आहे.या स्पर्धेमध्ये देशभरातील विविध महाविद्यालयातील २०३३ संघानी सहभाग नोंदविला होता.”जिनिअस नूबस” या टीमने “सायबर सेक्युरिटी” या विषया अंतर्गत  “नेटवर्क ट्रॅफिक अँनलायझर” हेसॉफ्टवेअर बनविले. विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस परिश्रम घेत सलग ३६ तास कोडींग करत तीन फेऱ्यांमध्ये झालेल्या  या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी टीममध्ये – शिवराज पाटील (टीम लीडर),  आशिष सोळंके, सुमेध पवार, समृद्धी कुलकर्णी, विशाल मुऱ्हाडे, विजय कागदे हे ०६ विद्यार्थी आणि प्रा. वैशाली गायकवाड, प्रा. मीनाक्षी पाचपाटील हे दोन  फॅकल्टी मेंटॉर यांनी परिश्रम घेतले.  “जिनिअस नूबस” या टीमच्या यशाबद्दल छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सचिव पद्माकरराव मुळे, अध्यक्ष  रणजित मुळे,  प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, छत्रपती शाहु  अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे, कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभाग प्रमुख डॉ. संदीप अभंग यांनी अभिनंदन व कौतुक केले.  

Read more

अखेर दोन्ही गटाला नावे मिळाली, उद्धव ठाकरे यांच्या हाती ‘मशाल’

तिसरा पर्याय म्हणून मशाल चिन्ह देण्यात आले आहे. शिंदे गटाला तीन नवीन चिन्हे देण्याची सूचना करण्यात आली मुंबई ,​१०​ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- उद्धव ठाकरे

Read more

औरंगाबाद औद्योगिक शहर हे जागतिक पातळीवर सर्वात अधिक विकसित अत्याधुनिक औद्योगिक शहरांपैकी एक– केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल

औद्योगिक स्मार्ट शहरांचे आंतरराष्ट्रीय मानकांनुसार नियोजन करण्यात आले आहे: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री केंद्रीय वाणिज्य तसेच उद्योगमंत्र्यांनी औरंगाबाद औद्योगिक शहरासारख्या

Read more

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन; ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

गुरुग्राम : समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यांचे निधन झाले आहे. ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा

Read more

औरंगाबादमध्ये बसच्या खिडकीतून डोके बाहेर काढणे विद्यार्थ्याच्या जीवावर बेतले

औरंगाबाद,१० ऑक्टोबर /प्रतिनिधी :- बसच्या खिडकीतून डोके बाहेर काढल्याने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. हरिओम

Read more

संजय राऊत यांना न्यायालयाकडून दिलासा नाहीच

मुंबई ,​१०​ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- शिवसेना खासदार संजय राऊत यांना पुन्हा न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

Read more

‘पंढरपूरची वारी’ छायाचित्र प्रदर्शनातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन – पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई ,​१०​ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- ‘पंढरपूरची वारी’ महाराष्ट्राच्या संस्कृतीचे तसेच मानवतेचे यथार्थ दर्शन घडवणारी असते. वारीची क्षणचित्रे कॅमेऱ्यात बद्ध करुन ते आपल्यापर्यंत पोहचविण्याचे काम छायाचित्रकारांनी

Read more