अतिवृष्टीमुळे व दरड कोसळून झालेल्या नागरिकांच्या मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्र्यांना दु:ख

मुंबई,२३ जुलै /प्रतिनिधी :- राज्यात अतिवृष्टीमुळे व दरड कोसळून झालेल्या नागरिकांच्या मृत्यूबद्दल उपमुख्यंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून

Read more

कोविड चाचण्या वाढविण्यावर अधिक भर द्या-प्रशासक आस्तिककुमार पांडेय

औरंगाबाद, २३ जुलै /प्रतिनिधी :- कोविड विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी प्रशासनामार्फत सर्वोतोपरी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून

Read more

खेळाडूंचे मनोबल वाढविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी त्यांना प्रोत्साहित करावे-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद,२३ जुलै /प्रतिनिधी :- जपानमध्ये होत असलेल्या ऑलंपिक मध्ये देशाचे नेतृत्व करणाऱ्या खेळाडूंचे मनोबल वाढविणे गरजेचे आहे. त्यांच्यामधील उत्साह वाढविण्यासाठी

Read more

लवकरात लवकर कोकण रेल्वे पुर्ववत करा

कोकणात गणेशोत्सवासाठी अजुन 40 गाड्या-रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे याची माहिती मुंबई ,२३ जुलै /प्रतिनिधी :- कोकणातील पूर परिस्थितीतून मार्ग काढून

Read more

राज्यात जिल्ह्याच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन होणार

सामाजिक न्याय विभागाचा पुढाकार ,पंधरा दिवसात कक्ष स्थापन करा- आयुक्त  डॉ प्रशांत नारनवरे  औरंगाबाद,२३ जुलै /प्रतिनिधी :-राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत शासन गंभीर असून ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या अनुषंगाने त्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेतला आहे. राज्याचे समाज कल्याण मंत्री  धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार राज्यात जिल्ह्याच्या ठिकाणी तात्काळ ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करण्यात यावा व पंधरा दिवसात प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले आहेत. दिनांक १६ जुलै २०२१ रोजी पुणे येथे समाज कल्याण विभागाच्या सर्व प्रादेशिक उपायुक्त समवेत राज्यस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन आयुक्त नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली बार्टी येथे करण्यात आले होते त्या प्रसंगी त्यांनी आदेशित केले आहे. कोरोना साथ रोगाचा  समाजातील सर्वच घटकांना  फटका बसला असून ज्येष्ठ नागरिकांचे देखील अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत, त्यांच्या सर्व  अडीअडचणीचे तात्काळ निवारण करण्यासाठी जिल्हा कक्षाच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे डॉ. नारनवरे यांनी यावेळी सूचित केले. जिल्ह्यात निर्माण करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक कक्षाचे लवकरच मंत्री महोदयांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याचे आयुक्त यांनी यावेळी सांगितले. संपूर्ण दिवसभर चाललेल्या या राज्यस्तरीय आढावा बैठकी प्रसंगी सामाजिक न्याय विभागाच्या अनेक योजनांचा आढावा घेण्यात आला. त्यात प्रामुख्याने विविध योजनांची करण्यात येत असलेल्या  मार्गदर्शिकेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली, तसेच समाज कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची ऑनलाइन संगणक प्रणाली विकसित करणेबाबत देखील यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. येणाऱ्या 25 वर्षातील विभागाची वाटचाल कशी राहील याबाबत व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात येत असून या व्हिजन डॉक्युमेंटबाबत देखील प्रादेशिक उपायुक्त यांनी  त्या त्या विभागाचे व्हिजन डॉक्युमेंटचे सादरीकरण केले. आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी क्षेत्रीय अधिकारी यांच्या  कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत सामाजिक न्याय विभागाच्या योजना पोचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे, असेही सुचित केले. बैठकीस अतिरिक्त आयुक्त दिलीप डोके, सहआयुक्त भारत केंद्रे ,सहआयुक्त वृषाली शिंदे, उपायुक्त प्रशांत चव्हाण, उपायुक्त रवींद्र कदम पाटील, जलील शेख, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण,औरंगाबाद यांच्यासह राज्यातील सर्व प्रादेशिक उपायुक्त, तसेच आयुक्तालयातील सर्व अधिकारी  यावेळी उपस्थित होते.

Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 31 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात एक लक्ष 43 हजार 371 कोरोनामुक्त, 289 रुग्णांवर उपचार सुरूऔरंगाबाद,२३ जुलै /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 16 जणांना (मनपा

Read more

किल्ल्यांच्या विकासासाठी पुरातत्त्व संचालनालयाने सर्किट योजना तयार करावी – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई,२३ जुलै /प्रतिनिधी :- मुंबईसह महाराष्ट्रात अनेक किल्ले आणि सागरी किल्ले आहेत. या सर्व किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व असून या किल्ल्यांचे

Read more

पं. नाथराव नेरलकर शिष्यांची गुरूपौर्णिमा साजरी

औरंगाबाद ,२३ जुलै /प्रतिनिधी :- अनंत संगीत विद्यालयाचे संस्थापक महान संगीतकार गायक कै. पंं. नाथराव नेरलकर यांच्या शिष्य वर्गाच्या वतीने

Read more

श्री शारदा मंदिर कन्या प्रशालेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

औरंगाबाद ,२३ जुलै /प्रतिनिधी :-​ श्री शारदा मंदिर कन्या प्रशालेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. शारदा मंदिर कन्या प्रशालेच्या शालेय

Read more

लोकमान्य टिळकांनी भारतीयांमध्ये स्वाभिमान जागवला : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. 23 : अनेक लोकांच्या त्याग, बलिदान व समर्पणातून देशाला स्वराज्य मिळाले. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी भारतीयांमध्ये स्वाभिमान जागवून नवचेतना निर्माण

Read more