आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी १ जुलैपर्यंत राज्यभर कृषी संजीवनी मोहिम – कृषीमंत्री दादाजी भुसे

मुंबई,२३ जून/प्रतिनिधी :- राज्यात खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी कृषी संजीवनी मोहिम राबविली जात आहे. या अंतर्गत दररोज एक विषय घेऊन संपूर्ण राज्यभर कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ, कृषी मित्र शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. दि.1 जुलैपर्यंत ही मोहिम सुरु राहणार असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. दरवर्षी 1 जुलैपासून ही मोहिम राबविली जाते. मात्र तो पर्यंत खरीत पिकांचा पेरणी आणि जमीन मशामगतीचा कालावधी सुरु झालेला असतो. ही बाब लक्षात घेऊन 1 जुलै पुर्वी ही मोहिम राबविण्याचा निर्णय घेतल्याचे कृषीमंत्र्यांनी  सांगितले. 21 जूनपासून राज्यात कृषी संजीवनी मोहिमेस प्रारंभ झाला असून त्याअंतर्गत बीबीएफ लागवड तंत्रज्ञान, बीजप्रक्रीय, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर या संदर्भात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे. उद्या 24 जून रोजी एक गाव एक कापूस वाण, सुधारित भात लागवड तंत्रज्ञान, ऊस लागवड तंत्रज्ञान, कडधान्य व तेल बिया क्षेत्रात आंतरपिक तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 25 जून रोजी विकेल ते पिकेल, 28 जूनला महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञानाचा प्रसार, 29 जूनला रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचा पीक उत्पादक वाढीसाठी सहभाग, 30 जूनला प्रत्येक जिल्ह्यातील महत्त्वाच्या पिकांची कीड व रोग नियंत्रण उपाययोजनाबाबत मार्गदर्शन केले जाणार  आहे. 1 जुलैला कृषी दिनी मोहिमेचा समारोप होणार आहे. मोहिमेमध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा यांनी दररोज किमान एका गावात तर उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी दररोज किमान दोन गावातील कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन करण्याबाबत कृषी संचालक विकास पाटील यांनी सूचना केल्या आहेत

Read more

आशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मागण्या मान्य झाल्याने संप मागे घेतल्याचे कृती समितीकडून घोषणा मुंबई,२३ जून/प्रतिनिधी :- राज्यातील ‘आशा’ स्वयंसेविकांना १ जुलै २०२१ पासून एक हजार

Read more

ग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर अवॉर्ड महापारेषणचे सीएमडी दिनेश वाघमारे यांना जाहीर

२७ ऑगस्टला सोनमर्गला पुरस्काराचे वितरण मुंबई,२३ जून/प्रतिनिधी :-नवी दिल्ली येथील ग्रीनटेक फौंडेशनच्या वतीने दिला जाणारा यंदाचा ‘ग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर अवॉर्ड-२०२१’

Read more

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णसेवेसह कोरोना काळात बजावलेल्या कर्तव्यनिष्ठेची नोंद इतिहासात होईल – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार

मुंबई,२३ जून/प्रतिनिधी :-  पुण्याच्या बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रुग्णसेवेची प्रदीर्घ परंपरा आहे. समाजासाठी तज्ज्ञ डॉक्टर घडविणाऱ्या देशभरातील संस्थांमध्ये बी.

Read more

शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांची बैठक,काय झालं बैठकीत?

नवी दिल्ली ,२२जून /प्रतिनिधी:-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवास्थानी आज विरोधी पक्षांच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली.  या

Read more

महाराष्ट्रात आज लसीकरणाचा उच्चांक:एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार नागरिकांना दिली लस

मुंबई, २२जून /प्रतिनिधी:- राज्यात आजपासून १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली.  राज्यात आज एकाच दिवशी ५ लाख ५२

Read more

पंतप्रधानांनी लिंक्डइनवर लिहीलेला लेख: इच्छाशक्ती आणि प्रोत्साहनाच्या मार्गाने सुधारणा

‘सुधारणा आणि धोरण निर्मिती’ या विषयावरील ब्लॉग पोस्ट पंतप्रधानांनी समाजमाध्यमांवर केली शेअर नवी दिल्‍ली, ,२२जून /प्रतिनिधी:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

Read more

डेल्टा प्लस व्हेरीयंट:केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र, केरळ आणि मध्यप्रदेश या राज्यांना दिला सल्ला

नवी दिल्‍ली, 22 जून 2021 कोविड-19 च्या प्रभावी व्यवस्थापनासाठी केंद्र सरकार सातत्याने बहुस्तरीय आरोग्य यंत्रणा आणि चाचणीच्या पायाभूत सुविधा अधिकाधिक बळकट

Read more

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन

मुंबई,२२जून /प्रतिनिधी:- कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबई येथे होणारे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

Read more