अजित सीड्सच्या जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्राला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची मान्यता

औरंगाबाद ,२८जुलै /प्रतिनिधी  :-अजित सीड्स  कंपनीच्या ‘प्लांट बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर’ ला डॉ. बाबासाहेब  आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने २३ जुलै २०२१रोजी पार पडलेल्या तज्ञ समितीच्या   बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे विद्यापीठामार्फत पी. एचडी. करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आधुनिक आणि उद्योगाधारित विषयात संशोधन करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.अजित सीड्स प्रा. लि कंपनी पद्माकर मुळे उद्योग समूहाचा एक भाग आहे, ही कंपनी१९८६ पासून दर्जेदार बियाणे देऊन शेतकऱ्यांचा सेवेत आहे. २००७ मध्ये गंगापूर (जि. औरंगाबाद) तालुक्यातील हनुमंतगाव येथे १० हजार चौरसफूट जागेत हे अद्ययावत सुविधांनी सज्ज असलेले संशोधन केंद्र सुरू केले आहे. या संशोधन केंद्राला भारत सरकारच्या ‘विज्ञान आणि औद्योगिक संशोधन विभागाची’ ही (DSIR)  मान्यता मिळालेली आहे. वनस्पती जैवतंत्रज्ञानाबाबत संशोधन करणे, हा या केंद्राचा  मुख्य उद्देश आहे. यात जनुक व प्रथिन अभियांत्रिकी, रोगप्रतिकारक शक्ती,  उती-संवर्धन आणि कीटकशास्त्राचा संशोधनात्मक अभ्यास केला जातो. पीक संरक्षण आणि उत्पादन वाढविण्यासाठी विशेष गुणधर्मीय वाण आणि तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी या केंद्रात संशोधन केले जाते.

Read more

सध्याच्या नैसर्गिक आपत्तीतही केंद्राने तातडीने मदत करावी – कृषिमंत्री भुसे

गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीतील पिक नुकसानीसाठी ७०१ कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल कृषिमंत्र्यांनी मानले केंद्र शासनाचे आभार मुंबई,२७जुलै /प्रतिनिधी :- राज्यात गेल्या

Read more

शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा – कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे सुस्पष्ट निर्देश

अमरावती, २५जुलै /प्रतिनिधी:- पीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन

Read more

अतिवृष्टीग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या

 खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी नांदेड : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून हजारो हेक्टरवरील पिके  पाण्याखाली गेले आहेत.पुरामुळे पिके वाहत गेलेअसूनजमीनखरडूनगेलीआहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत अतिवृष्टीग्रस्त  भागातील पिकांचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे .      नांदेड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात जोरदार पाऊस झाल्याने नदी नाल्याचे पाणी अनेक भागात शिरले. नदीकाठची शेती खरडून गेली तर हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली आहेत. नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात अतिवृष्टीचा फटका बसला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अत्यंत कष्टाने खरीपाच्या पेरण्या केलेल्या शेतकऱ्याच्या सुखाची स्वप्न अतिवृष्टीने हिरावली आहेत .अशा परिस्थिती शेतकर्‍यांची मानसिक स्थिती खालावलीजाण्याची शक्यता नाकारता येत नाही .त्यामुळे शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी आणि या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी राज्य सरकारने नुकसान ग्रस्त भागातील पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात तातडीची आर्थिक मदत जमा  करावी अशी मागणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली आहे .  दरम्यान सन 2018 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये कंधार – लोहा विधानसभा मतदार संघातील उस्माननगर आणि  बारूळ मंडळात ढगफुटी झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तत्कालीन आमदार म्हणून आपण  तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शेतकऱ्यांना तातडीची मदत करण्याच्या अनुषंगाने विनंती केली होती.शेतकरी हिताचे निर्णय त्वरीत घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त  शेतकाऱ्यांसाठी 43 कोटी 65 लाख 85 हजार 20 रुयांचा निधी मंजूर केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक हातभार मिळाला आणि नैसर्गिक संकटातून शेतकरी सावरू शकला . कोवीडमुळे अगोदरच शेतकरी, शेतमजूर संकाटात सापडला असून आता

Read more

‘कोरोना’सारख्या संकट काळातही कृषी क्षेत्राने राज्याची अर्थव्यवस्था सावरली – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार

कृषिभूषण डॉ.आप्पासाहेब पवार कृषिनिष्ठ शेतकरी, शरद आदर्श कृषिग्राम पुरस्कारांसह आदर्श गोपालक पुरस्काराचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण पुणे, १६जुलै /प्रतिनिधी :- गेल्या

Read more

कोरोना प्रादुर्भावामुळे कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलत; राज्यातील ४५ हजार विद्यार्थ्यांना होणार लाभ

शुल्क सवलतीसाठी कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरूंची बैठक मुंबई,१४जुलै /प्रतिनिधी :- कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या धर्तीवर चारही कृषी

Read more

राज्यात सोयाबीन पिकाची ९९ टक्के तर कापसाची ८१ टक्के क्षेत्रावर पेरणी – कृषिमंत्री दादाजी भुसे

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी उद्या अंतिम मुदत मुंबई,१४जुलै /प्रतिनिधी :- राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप 2021साठी आतापर्यंत 37

Read more

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत एकरी ऊस उत्पादन वाढवा – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा महसूलमंत्र्यांच्या हस्ते सत्कार शिर्डी, ११ जुलै /प्रतिनिधी :- शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहिले तर नवीन रोजगाराबरोबर उत्पादकता

Read more

शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने समृद्ध करतील शेतकरी उत्पादक कंपन्या : कृषीमंत्री दादाजी भुसे

मालेगांव,११ जुलै /प्रतिनिधी :- शेतकऱ्यांच्या व्यथा आणि कथांचा अभ्यास मी अनुभवला आहे. शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करण्यासाठी राज्यशासनाने शेतकरी उत्पादक

Read more

मोदी सरकारचे कृषी कायदे राज्यात जसेच्या तसे लागू करा

भाजपा किसान मोर्चा राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. अनिल बोंडे यांची मागणी मुंबई, 10 जुलै 2021 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशातील शेतकऱ्यांना मालाच्या

Read more