अतिवृष्टीग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या

 खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी नांदेड : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून हजारो हेक्टरवरील पिके  पाण्याखाली गेले आहेत.पुरामुळे पिके वाहत गेलेअसूनजमीनखरडूनगेलीआहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत अतिवृष्टीग्रस्त  भागातील पिकांचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे .      नांदेड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात जोरदार पाऊस झाल्याने नदी नाल्याचे पाणी अनेक भागात शिरले. नदीकाठची शेती खरडून गेली तर हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली आहेत. नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात अतिवृष्टीचा फटका बसला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अत्यंत कष्टाने खरीपाच्या पेरण्या केलेल्या शेतकऱ्याच्या सुखाची स्वप्न अतिवृष्टीने हिरावली आहेत .अशा परिस्थिती शेतकर्‍यांची मानसिक स्थिती खालावलीजाण्याची शक्यता नाकारता येत नाही .त्यामुळे शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी आणि या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी राज्य सरकारने नुकसान ग्रस्त भागातील पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात तातडीची आर्थिक मदत जमा  करावी अशी मागणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली आहे .  दरम्यान सन 2018 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये कंधार – लोहा विधानसभा मतदार संघातील उस्माननगर आणि  बारूळ मंडळात ढगफुटी झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तत्कालीन आमदार म्हणून आपण  तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शेतकऱ्यांना तातडीची मदत करण्याच्या अनुषंगाने विनंती केली होती.शेतकरी हिताचे निर्णय त्वरीत घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त  शेतकाऱ्यांसाठी 43 कोटी 65 लाख 85 हजार 20 रुयांचा निधी मंजूर केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक हातभार मिळाला आणि नैसर्गिक संकटातून शेतकरी सावरू शकला . कोवीडमुळे अगोदरच शेतकरी, शेतमजूर संकाटात सापडला असून आता

Read more

९७ गावांच्या स्मशानभूमीला खाजगी जमिनीसाठी ५ कोटी रुपयांची तरतूद – पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड,२२ जुलै /प्रतिनिधी:- जिल्ह्यातील असंख्य गावांना स्वत:ची स्मशानभूमी नसल्याने होणारी मानसिक घालमेल लक्षात घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण

Read more

‘स्वारातीम’ विद्यापीठातर्फे ‘स्वयम’ ऑनलाईन कोर्सेसला नाव नोंदणी करण्याचे आवाहन

नांदेड ,१९जुलै /प्रतिनिधी :-भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या आणि विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरलेल्या ‘स्वयम’ ऑनलाईन कोर्सेसला दि.२६ जुलै, पर्यंत ऑनलाईन नाव

Read more

नांदेड जिल्ह्याच्या कोविड-19 व्यवस्थापनाचा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केला गौरव

नांदेड येथे बालकांच्या कोविड-19 वर कार्यशाळा संभाव्य कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आढावा नांदेड,१५जुलै / प्रतिनिधी:- गतवर्षाच्या मार्चपासून सुरू झालेला

Read more

‘उर्दू घर’च्या माध्यमातून नव्या सांस्कृतिक पर्वाचा प्रारंभ – पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड,१५जुलै / प्रतिनिधी:- उर्दू भाषेने साहित्याच्या क्षेत्रात दिलेले योगदान आणि भाषा म्हणून यात असलेली गोडी ही कोणत्याही धार्मिक चौकटीत बंदिस्त

Read more

निसर्गाला पूरक अशा पद्धतीनेच विकास योजनातील नव्या इमारतींची रचना आवश्यक – अशोक चव्हाण

विविध विकास योजनांचा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतला आढावा नांदेड,१५जुलै / प्रतिनिधी:- विविध विकास योजनेंतर्गत शासन जनतेच्या कल्याणासाठी पुरेसा निधी

Read more

स्वारातीम विद्यापीठांतर्गत उन्हाळी-२०२१ परीक्षा पुढे ढकलल्या

नांदेड,१४जुलै /प्रतिनिधी :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत उन्हाळी-२०२१ सर्व पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने अनुक्रमे

Read more

जल व्यवस्थापनातील निर्मळतेचा समृद्ध काठ : डॉ. शंकरराव चव्हाण

माजी मुख्यमंत्री डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त…. मराठवाड्याच्या वाट्याला केवळ इतिहासाचे विविध संदर्भ वाट्याला आले असे नाही तर भौगोलिकदृष्ट्याही हा प्रांत

Read more

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के

नांदेड ,११ जुलै /प्रतिनिधी :-नांदेड जिल्ह्यात आज सकाळी अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. उपलब्ध माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू यवतमाळ

Read more

नांदेड जिल्ह्यातील ११३ किलोमीटर रस्त्यांची प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जा वाढ – पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई,१०जुलै /प्रतिनिधी :- नांदेड जिल्ह्यातील सुमारे 113 किमी इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्त्यांना दर्जोन्नत करून ते प्रमुख जिल्हा

Read more