राज्यात ४२ हजार ६०० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू, १२० रुग्णांच्या मृत्यूची नोंद

आतापर्यंत ३७ हजार ३९० रुग्णांना घरी सोडले – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई, दि.६ : राज्यात आज २२३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार ३९० झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २७३९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४२ हजार ६०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात कोरोनाचे ३०९४ रुग्ण बरे होऊन घरी

राज्यात ४७ शासकीय आणि ३८ खाजगी अशा एकूण ८५ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ३७ हजार १२४ नमुन्यांपैकी ८२ हजार ९६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ४६ हजार ५६६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक  क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ७४१ खाटा उपलब्ध असून सध्या २९ हजार ०९८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात १२० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ९० (मुंबई ५८, ठाणे १०, उल्हासनगर ६, वसई विरार १, भिवंडी ३, मीरा-भाईंदर ५, पालघर १), नाशिक- ७ (नाशिक ५, मालेगाव २), पुणे- १७ (पुणे १०, सातारा ५, सोलापूर २), औरंगाबाद-२ (औरंगाबाद मनपा २), अकोला-४ (अकोला मनपा २, अमरावती २)

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७८ पुरुष तर ४२ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १२० मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ५३ रुग्ण आहेत तर ४७  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर २० जण ४० वर्षांखालील आहेत. या १२० रुग्णांपैकी ६९ जणांमध्ये (५७.५ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २९६९ झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३० मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू ३ मे ते ३ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ९० मृत्यूंपैकी मुंबई ५३, मीरा भाईंदर – ५, भिवंडी -३, ठाणे -९, उल्हासनगर -६, नवी मुंबई -६, सातारा- २,  वसई विरार -१, अमरावती -१, औरंगाबाद -१, मालेगाव- १, नाशिक -१ , सोलापूर १असे मृत्यू आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (४७,३५४), बरे झालेले रुग्ण- (१९,९७७), मृत्यू- (१५७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५,७९४)

ठाणे: बाधित रुग्ण- (१२,४६४), बरे झालेले रुग्ण- (४६८६), मृत्यू- (३२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७४५६)

पालघर: बाधित रुग्ण- (१३८६), बरे झालेले रुग्ण- (५८१), मृत्यू- (३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७६६)

रायगड: बाधित रुग्ण- (१४११), बरे झालेले रुग्ण- (७१७), मृत्यू- (५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३७)

नाशिक: बाधित रुग्ण- (१४१२), बरे झालेले रुग्ण- (१०१२), मृत्यू- (८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१२)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१९०), बरे झालेले रुग्ण- (८९), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९३)

धुळे: बाधित रुग्ण- (२३१), बरे झालेले रुग्ण- (१०८), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०२)

जळगाव: बाधित रुग्ण- (९६३), बरे झालेले रुग्ण- (६११), मृत्यू- (१०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४३)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (४०), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८)

पुणे: बाधित रुग्ण- (९२८९), बरे झालेले रुग्ण- (५१९५), मृत्यू- (४००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६९४)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१२६१), बरे झालेले रुग्ण- (६२०), मृत्यू- (९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४५)

सातारा:  बाधित रुग्ण- (६२६), बरे झालेले रुग्ण- (२९१), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०८)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (६३८), बरे झालेले रुग्ण- (३३४), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९८)

सांगली: बाधित रुग्ण- (१८५), बरे झालेले रुग्ण- (८६), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (११३), बरे झालेले रुग्ण- (१७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९६)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (३५२), बरे झालेले रुग्ण- (१५८), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८४)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१८६१), बरे झालेले रुग्ण- (११८१), मृत्यू- (९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८८)

जालना: बाधित रुग्ण- (१७७), बरे झालेले रुग्ण- (८५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८९)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२०६), बरे झालेले रुग्ण- (१६३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३)

परभणी: बाधित रुग्ण- (७८), बरे झालेले रुग्ण- (४६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९)

लातूर: बाधित रुग्ण- (१३५), बरे झालेले रुग्ण- (९४), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (११८), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७)

बीड: बाधित रुग्ण- (५३), बरे झालेले रुग्ण- (३८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१४)

नांदेड: बाधित रुग्ण- (१६८), बरे झालेले रुग्ण- (१०४), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७)

अकोला: बाधित रुग्ण- (७६२), बरे झालेले रुग्ण- (४३९), मृत्यू- (३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८७)

अमरावती: बाधित रुग्ण- (२८९), बरे झालेले रुग्ण- (१६६), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०५)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१६४), बरे झालेले रुग्ण- (१०४), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (८६), बरे झालेले रुग्ण- (४८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५)

वाशिम: बाधित रुग्ण- (९), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१)

नागपूर: बाधित रुग्ण- (७३८), बरे झालेले रुग्ण- (४१६), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३११)

वर्धा: बाधित रुग्ण- (९), बरे झालेले रुग्ण- (७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१)

भंडारा: बाधित रुग्ण- (३९), बरे झालेले रुग्ण- (१८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१)

गोंदिया: बाधित रुग्ण- (६८), बरे झालेले रुग्ण- (५७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (३१), बरे झालेले रुग्ण- (२५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (४१), बरे झालेले रुग्ण- (२५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (६५), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७)

एकूण:बाधित रुग्ण-(८२,९६८), बरे झालेले रुग्ण- (३७,३९०), मृत्यू- (२९६९),इतरकारणांमुळेझालेलेमृत्यू-(९),ॲक्टिव्ह रुग्ण-(४२६००)

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

गेल्या 24 तासात कोविड-19 चे 4,611 रुग्ण बरे झाले आहेत. कोविड-19 चे आत्तापर्यंत एकूण 1,14,073 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे कोविड-19 रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 48.20% वर पोहोचले आहे. आजमितीस 1,15,942 रुग्ण संक्रमित असून ते सक्रिय वैद्यकीय परीक्षणाखाली आहेत.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने संक्रमित व्यक्तींमध्ये नोवेल कोरोना विषाणू शोधण्यासाठी चाचणी क्षमता वाढविली आहे. सरकारी प्रयोशाळांची संख्या 520 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 222 पर्यंत (एकूण 742) वाढविण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 1,37,938 नमुने तपासण्यात आले. आतापर्यंत चाचणी केलेल्या नमुन्यांची एकूण संख्या 45,24,317 आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *