महाराष्ट्र, केरळ आणि पंजाब ,कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांत दैनंदिन रुग्णसंख्येतील मोठी वाढ

भारतातील कोविड लसीकरणाने ओलांडला 2 कोटींचा टप्पा
केंद्राकडून महाराष्ट्र आणि पंजाबसाठी उच्च स्तरीय समिती  नियुक्त

देशभरातील सहा राज्यांत दैनंदिन कोविड-19 रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्याची नोंद होत आहे. महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि  तामिळनाडू  या  राज्यांचा त्यात समावेश आहे. आहे. गेल्या 24 तासांतील  नव्या  रुग्णसंख्येतील एकूण वाढ  84.71% असून 18,711 नव्या रूग्णांची  नोंद झाली आहे.महाराष्ट्रात  सर्वाधिक रूग्णांची नोंद झाली असून 10,187 नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्याखालोखाल केरळमध्ये  2,791 तर पंजाबमध्ये 1,159 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे.

केंद्र सरकार सतत सक्रीय रुग्णांची वाढ नोंदविणाऱ्या  आणि जेथे कोविड रूग्णसंख्येत सतत वाढ होत आहे अशा  दैनंदिन राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या संपर्कात आहे.दैनंदिन रुग्णसंख्येतील  मोठी वाढ दर्शविणाऱ्या  महाराष्ट्र आणि पंजाबसाठी उच्च स्तरीय समिती केंद्राकडून नियुक्त करण्यात आली आहे.

आठ राज्यांत दैनंदिन  रूग्णांत सतत वाढ होत असलेली दिसून येत आहे.भारतातील सक्रीय रुग्णांची संख्या आज 1.84 लाखांवर (1,84,523) पोचली आहे. भारतातील सक्रीय रूग्णसंख्या एकूण रुग्णसंख्येच्या 1.65 %इतकी आहे.

आतापर्यंत प्राप्त तात्पुरत्या अहवालानुसार आज सकाळी 7 वाजेपर्यंत 2 कोटीपेक्षा अधिक (2,09,22,344) लोकांना 3,39,145 सत्रांद्वारे  लसीची मात्रा देण्यात आली.यात 69,82,637,आरोग्य कोविड योध्दे  (एचसीडब्ल्यूज, पहिली मात्रा) 35,42,123 आरोग्य कोविड योध्दे( एचसीडब्ल्यूज ,दुसरी मात्रा) आणि 65,85,637 आघाडीवरील  कोविड योध्दे(एफ एल डब्ल्यूज, पहिली मात्रा) आणि 211,918 आघाडी वरील  कोविड योध्दे(एफएलडब्ल्यूजना ,दुसरी मात्रा) सहव्याधी  असलेल्या 45 वर्षांहून अधिक वयोगटातील 4,76,041, लोकांना (पहिली मात्रा) तर 60 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील 31,23,873  (पहिली मात्रा)लोकांना कोविड लसीचा मात्रा देण्यात आली.

आज, लसीकरण मोहिमेच्या  50 व्या दिवशी (दिनांक 6 मार्च 2021)एकूण 4लाखांपेक्षा जास्त (14,24,693)लसी देण्यात आल्या. यापैकी 11,71,673 लाभार्थ्यांना एकूण 17,654 सत्रांद्वारे लसीची पहिली मात्रा (एचसीडब्ल्यूज आणि एफएल डब्ल्यूज)देण्यात आली तर 2,53,020 जणांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली .

गेल्या 24 तासांत 100  मृत्यूंची नोंद झाली.

मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी 87% मृत्यु हे सहा राज्यांत झाले आहेत.महाराष्ट्रात सर्वाधिक (47) मृत्यू झाले असून त्याखालोखाल केरळमध्ये 16 तर पंजाबमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे.19 राज्यांत गेल्या 24 तासांत एकाही मृत्यूची नोंद कोविड-19 मुळे झालेली  नाही. यात राजस्थान ,उत्तरप्रदेश, चंदिगड, उत्तराखंड, गोवा, ओदिशा, हिमाचल प्रदेश, झारखंड, सिक्कीम, गोवा,लक्षद्वीप, लडाख (केंद्रशासित प्रदेश), मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, नागालँड, डी अँड डी,दादरा-नगरहवेली, त्रिपुरा, मिझोराम  आणि अरुणाचल प्रदेश, या   राज्यांचा समावेश  आहे.