नांदेड जिल्ह्यात 229 व्यक्ती कोरोना बाधित तर एकाचा मृत्यू

नांदेड दि. 7 :- रविवार 7 मार्च 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 229 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 98 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 131 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 114 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या 1 हजार 369 अहवालापैकी 1 हजार 109 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 24 हजार 538 एवढी झाली असून यातील 22 हजार 818 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 899 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 22 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

शनिवार 6 मार्च 2021 रोजी अय्यप्पा स्वामी नगर किनवट येथील 78 वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्याल विष्णूपूरी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 606 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 81, देगलूर कोविड रुग्णालय 1, किनवट कोविड रुग्णालय 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 8, भोकर तालुक्याअंतर्गत 4, खाजगी रुग्णालय 15 असे एकूण 114 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 92.99 टक्के आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 40 हजार 437एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 11 हजार 502एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 24 हजार 538एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 22 हजार 818एकुण मृत्यू संख्या-606उपचारानंतर बाधित रुग्ण घरी (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 92.99 टक्केआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-16आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-6आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-239रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-899आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-22.