हर्सूल कारागृहात कोरोना ,बाधितांची संख्या २९

जिल्ह्यात 1184 कोरोनामुक्त, 667 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दि. 06 :  औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1184 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 667 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 104 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यात 1950 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.यामध्ये हर्सूल कारागृहात बाधितांची संख्या २९ असल्याने खळबळ उडाली आहे. 

News - COVID-19 Government of India Guidelines

          आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. पिंपळगाव देवशी, गंगापूर (1), भवानी नगर (2), राधास्वामी कॉलनी (1), भारतमाता नगर, एन 12 (1), हर्सुल परिसर (1), गारखेडा परिसर (3), मिल कॉर्नर (2), अहिंसा नगर (1), शिवशंकर कॉलनी (2), आकाशवाणी परिसर (1), न्याय नगर (1), कैलास नगर (1), आंबेडकर नगर (2), एन 11 टी.व्ही सेंटर (2), एन आठ, सिडको (2), रोशन गेट (6), बीड बायपास रोड (1), हुसेन कॉलनी (3), हनुमान नगर (1), गादिया विहार, शंभू नगर (1), तोफखाना, छावणी (1), पीर बाजार उस्मानपुरा (4), भीमनगर, भावसिंगपुरा (2), जुनी मुकुंदवाडी (1),संजय नगर (3), पद्मपुरा (1),समता नगर (1), युनुस कॉलनी (1), जुना बाजार (1), जय भीम नगर (2), गौतम नगर (1), नॅशनल कॉलनी (2), लेबर कॉलनी (3), देवडी बाजार (1), वेदांत नगर (1), बुद्ध नगर, जवाहर कॉलनी (1), अल्तमश कॉलनी (1), पैठण गेट (1),  रेहमानिया कॉलनी (1), पिसादेवी रोड (1), हर्सूल जेल (29), पुंडलिक नगर (1),  गल्ली नं. 18, शरीफ कॉलनी, रोशन गेट (2), जहागीरदार कॉलनी, रेल्वे स्टेशन परिसर (1), उत्तम नगर (1), बारुदगरनाला, औरंगपुरा (1), जिन्सी (1), सादात नगर (1), घाटी परिसर (1) अन्य (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 23 महिला आणि 81 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत 1184 जण कोरोनामुक्त

          मनपाच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, मिनी घाटी, घाटी येथून आजपर्यंत एकूण 1184 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.

घाटीत चार कोरोनाबाधितांचा मृत्यू

          शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) औरंगाबाद शहरातील चंपा चौकातील 50 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा पाच जून रोजी दुपारी 3.15 वा., सवेरा पार्क, हर्सुल येथील 70 वर्षीय पुरूष कोरोनाबाधित रुग्णाचा पाच जून रोजी रात्री 9.30 वाजता, किराडपुरा येथील 50 वर्षीय महिला कोरोनाबाधित रुग्णाचा आज सकाळी  6.10 वाजता व जटवाडा रोड, हर्सुल परिसर  येथील 63 वर्षीय कोरोनाबाधित महिला रुग्णाचा दुपारी 2.25 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत 78, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 20, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 99 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *