392 कोटीं रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक,दोघांना अटक

सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालय (पूर्व दिल्ली) कडून कारवाई 
Delhi East CGST Officials arrest man for input tax credit fraud of Rs 38.91  crore

नवी दिल्‍ली, 5 मार्च 2021
 

बनावट बिलिंग व्यवहार समूळ नष्ट करण्याच्या सातत्यपूर्ण  प्रयत्नात, दिल्ली (पूर्व) च्या  केंद्रीय वस्तू व सेवा कर (सीजीएसटी) आयुक्तालयाच्या  अधिका्यांना आणखी एका प्रकरणी यश मिळाले आहे. त्यांनी वस्तू व सेवा कराचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट बिल तयार करून ते मिळवणाऱ्या  बनावट कंपन्यांचे मोठे जाळे उघडकीला आणले आहे. नरेश धोंडियाळ हा  पेशाने सनदी लेखापाल असलेल्या  देवेंद्रकुमार गोयल याच्या मदतीने  या  बनावट कंपन्यांचे व्यवहार पाहत होता.  नरेश धौंडियाल आणि देवेंद्रकुमार गोयल हे दोघेही एस्सेल उद्योग समूहाचे माजी कर्मचारी आहेत.

नरेश धौंडियाल याने  एस्सेल समूहासाठी अनेक बनावट मध्यस्थ कंपन्या सुरु केल्या  तर देवेंद्रकुमार गोयल याने  अशा प्रकारच्या बनावट मध्यस्थ कंपन्यांसाठी अन्य अनेक बनावट आणि अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या बनावट पावत्यांची  व्यवस्था केली. अशा बनावट मध्यस्थ कंपन्यांकडून  बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटची एकूण रक्कम 92.18 कोटी रुपये आहे तर  मोठ्या नेटवर्कशी संबंधित इतर बनावट आणि अस्तित्त्वात नसलेल्या कंपन्यांनी दिलेले एकूण बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. कोणतीही वस्तू किंवा सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता 3,000 कोटींहून अधिक रकमेची बनावट बिले जारी करून या समूहाने सरकारची 392 कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केली आहे. जसजसा तपास पुढे जाईल तसे या रकमेत वाढ होण्याची  शक्यता आहे.

सीजीएसटी कायदा 2017 च्या कलम 132(1)(b) आणि  132(1)(c )अन्वये  जाणीवपूर्वक सरकारची फसवणूक करण्याच्या हेतूने नरेश धौंडियाल आणि देवेंद्रकुमार गोयल, यांनी रचलेला कट कलम  132  च्या तरतुदीनुसार दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हे आहेत

सीएजीएसटी कायदा 2017 च्या कलम 69(1) अन्वये दोघांना अटक करण्यात आली आणि 04.03.2021  रोजी दंडाधिकर्यासमोर हजर केले. त्यांनी 18.03.2021  पर्यंत १४  दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

जीएसटी केंद्रीय कराच्या स्थापनेपासून दिल्ली विभागाने 4,450.86 कोटी रुपयांच्या जीएसटी चुकवेगिरीच्या  विविध प्रकरणांमध्ये 30 जणांना अटक केली आहे याचा  उल्लेख करणे आवश्यक आहे.