आमचं हिंदुत्व केवळ शेंडी अन जान्हव्यांचे नाही,मुख्यमंत्री उध्दव ठाकरे चौफेर फटकेबाजी
मुंबई, ता. 3 : “बाबरी मशिद प्रकरणानंतर पळ काढणार्यांनी शिवसेनेला हिणवू नये. आमचं हिंदुत्व केवळ शेंडी अन जान्हव्यांचे नाही.” असे आक्रमक फटकारे लगावत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज भारतीय जनता पक्षाला विधानसभेत लक्ष्य केले. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी करत विरोधी पक्षाच्या आरोपांची व टीकेची खिल्ली उडवली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या चर्चेत सहभागी होताना महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. या सर्व आरोपांना उत्तर देताना ठाकरे यांनी राजकिय कोपरखळ्या मारत आक्रमक शैलित प्रत्यूत्तर दिले.
कोरोनाच्या काळात राज्य सरकार अपयशी ठरल्याच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, “जगावर संकट असताना आपल्या राज्यात मात्र कोरोनावरून सुरू असलेले राजकारण निंदनिय आहे. महाविकास आघाडी सरकारने गोरगरीब जनतेसाठी पाच रूपयांत शिवभोजनाच्या थाळीची व्यवस्था केली. याऊलट तुम्ही रिकाम्या थाळ्या वाजवून कोरोना विरोधात लढायला सांगितले. आम्ही जनतेच्या पोटची भूख भागावी म्हणून भरलेली शिवभोजन थाळी दिली तर तुम्ही त्याच जनतेच्या हातात रिकामी थाळी दिली. तुमच्या अन आमच्या सरकारमधे हाच फरक असल्याचा टोला ठाकरे यांनी विरोधकांना लगावला.
दरम्यान हिंदुत्वावरून ठाकरे आज विरोधकांवर आक्रमक झाले. ज्या सावरकरांचे नाव घेवून तुम्ही हिंदुत्व गाजवता त्या सावरकरांना दिल्लीतल्या सरकारने का भारतरत्न दिला नाही ? असा सवाल करत औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करूनच दाखवू. पण त्याअगोदर केंद्र सरकारला राज्याने औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी राजे यांचे नाव देण्याचा पाठवलेला प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रयत्न करा. असे आवाहन केले.
संत नामदेव महाराज यांचे नाव महापुरूषांच्या यादीत जरूर टाकू अशी घोषणाही ठाकरे यांनी केली. मात्र ज्या विरोधी पक्षनेत्यांनी ही मागणी केली त्यांनी संत नामदेवानी पंजाब मधे शेतकरी समाजासाठी दिलेले योगदान लक्षात घ्यावे. आज पंजाबचा शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बसला आहे. त्यांना रोखण्यासाठी वाटेत काटरी कुंपन लावली असून रस्त्यावर खिळे ठोकले अशी दुटप्पी भूमिका विरोधकांची असल्याचा टोला ठाकरे यांनी लगावला.
भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे नाव घेत ठाकरे यांनी युतीच्या बाबत बंद खोलीतल्या चर्चेचा समाचार घेतला. खोटं बोल पण रेटून बोला अशी संस्कृती विरोधकांची असल्याची टीकाही यावेळी ठाकरे यांनी केली.
दरम्यान भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी शिवसेना नव्हती अशी माहिती देतानाच भाजपची मातृसंस्था मानल्या जाणार्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही सहभाग नव्हता. मात्र स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीकारकांना आपलेच नेते म्हणवून घेण्यात भाजप धन्यता मानतो. महात्मा गांधींना यांनी आपले केले. अन आता सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने असणार्या मैदानाचे नावही बदलले. असा टोला लगावत स्वतःच्या पक्षाला नेते तयार करता आले नाहीत पण दुसर्यांचे नेते आपले म्हणून मोठे होण्याची पध्दत सुरू असल्याची टीका ठाकरे यांनी केली.
नटसम्राट मुनगंठीवार
यावेळी बोलताना उध्दव ठाकरे यांनी भाजपा आमदार सुधीर मुनगंठीवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मुनगंठीवार यांच्या दिर्घ व आक्रमक भाषणाला प्रत्तूत्तर देताना ठाकरे यांनी मुनगंठीवार यांना नटसम्राट ची उपमा दिली. सुधीरभाऊ आपण उत्तम कलाकार आहात. आपले भाषण ऐकताना नटसम्राट ची आठवण होते असा टोला लगावला. आपली ही कला अशीच जपून ठेवा. पण कलाकारांना आपल्या क्षेत्रात न्याय मिळत नाही याची खंत असल्याची कोपरखळी लगावली.
मु्ंबई : कोरोना काळात एकही रुग्ण लपवलेला नाही, असं सांगून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज, विधिमंडळात विरोधकांवर शरसंधान साधलं. कोविड काळात राज्य सरकारनं खूप काम केलं. कोरोना रुग्णांसाठी खासगी रुग्णालयांमधील बेड घेतले होते. पाच लाखांवर रुग्णांना महात्मा फुले योजनेचा लाभ मिळवून दिला, अशी माहिती देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या कामांचा पाढा वाचला. त्याचवेळी त्यांनी भाजप आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस एकसे एक टोले लगावले. कोरोनाकाळात राज्याला आर्थिक मदत हवी होती. त्यावेळी अनेकांनी गोळा केलेला निधी दिल्लीला गेला. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत मिळाली नाही. ज्यांनी दिली त्यांचे आभार पण, बाकीच्यांनी याचा विचार करावा, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
- औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर नक्की करू
- खोटेपणा आमच्या रक्तात नाही, कधीही खोटे बोललो नाही, बोलणार नाही
- योजनांचा धूर निघतोय आणि गॅस बंद झालाय
- मला राज्याच्या जनतेची काळजी, मला वाईट म्हटलं तरी मी काळजी घेणार
- राज्यातील जनतेची सुरक्षा हे आमच्या सरकारचं पहिलं कर्तव्य
- मास्क घालणं, सतत हात धुणं आणि सोशल डिस्टंसिंग ही त्रिसूत्री पाळायलाच हवी
- कोरोनाला सत्ताधारी आणि विरोधक पाहत नाही
- शेतकऱ्याला हमखास भाव मिळाला पाहिजे, ही आमच्या सरकारची भूमिका
उद्धव ठाकरेंचे भाजपला टोले
- पाठ थोपटून घेण्यासाठी काम करणारी छाती लागते
- सरदार पटेलांच्या स्टेडियमचं नाव का बदललं?
- सावरकरांना भारतरत्न का देत नाही?
- पीएम केअर फंडाविषयी कोणाची बोलायची हिंमत नाही
- शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला की पळे
- शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर असं ताटकळत ठेवत असाल तर, भारतमाता की जय म्हणण्याचा अधिकार नाही
- सायकली हवा भरण्याचेही दर वाढू शकाल
मुंबई : “मी जबाबदार ही मोहीम हे उघड ते उघडा त्यांच्यासाठी आहे. मला वाईट म्हटलं तरी चालेल मी वाईटपणा घेईन. माझी थट्टा करा, जनतेच्या जीवाशी खेळ करु नका. पण एका वर्गासाठी समाज धोक्यात घातला तर तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. कोरोना विषाणू सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ओळखत नाही,” अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं. विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर चर्चेदरम्यान विरोधकांनी मी जबाबदार मोहिमेवरुन सरकारवर तसंच मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. त्याला कधी कोपरखळी मारत, टोला लगावत किंवा सज्जड दम भरत उत्तर दिलं.
विरोधकांचा थटथयाट पाहून मला नटसम्राट आठवला, अशी टोला मुख्यमंत्र्यांनी भाजपला लगावला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही कोपरखळी मारली. कोरोना म्हणतो की मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन…कोरोना हा विषाणू आहे, त्यामुळे काळजी घ्या, असं मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील एकही कोरोना रुग्ण लपवलेला नाही किंवा एका रुग्णाचाही मृत्यू लपवलेला नाही. सरकार आवश्यक ती खबरदारी घेत आहे. देशातील सर्वात मोठं कोविड सेंटर आपण सुरु केलं. सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी पुरेशा सुविधा नव्हत्या, त्या वाढवल्या, असं म्हणत त्यांनी भाजपने केलेल्या भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळाले. माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत महसूल, आरोग्याचे कर्मचारी राज्यात घरोघर गेले. यामुळे सहव्याधी असलेले रुग्ण लक्षात आले. सरकार खबरदारी घेत आहे. देशात जगात पहिले जम्बो हॉस्पिटल आपण उभे केले. किती जणांना उपचार दिले ही माहिती ही आपल्याकडे आहे.
मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्हवरुनही भाजपने टीका केली होती. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, “आपण फेसबुक लाईव्हचा उल्लेख केला. मी महाराष्ट्रातील जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला. काय करावे काय करु नये हे सांगितलं. त्यामुळे महाराष्ट्राची जनता मला त्यांच्या परिवारातील एक मानू लागले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. रुग्ण संख्या वाढत आहेत आज. काय करायचे काही नाही. दुर्देवाने थोडे इकडे तिकडे झाले आणि मी पुन्हा येईन म्हणत व्हायरस परत आला.
हिंदुत्त्व शिकवू नका, तुमची पात्रता नाही
“बाळासाहेबांची आठवण तुम्ही वेळोवेळी काढली. त्यांना विसरला नाहीत. धन्यवाद. पण त्यांचे हिंदुत्व तरी विसरु नका. बाबरी पाडताना येरेगबाळे पळून गेले. बाळासाहेब राहिले होते. शिवसेनाप्रमुखांनी म्हटलं जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली तर मला अभिमान आहे आणि हे म्हणाले आम्ही नाही पाडले. राम मंदिरासाठी आता घरोघर पैसे मागता. पण नाव मात्र आमचे राहिले पाहिजे हा आग्रह. काश्मीर पंडित निर्वासित होऊन जगत होते तेव्हा शिवसेनाप्रमुखांमुळे काश्मिरी पंडितांना हक्काचे स्थान मिळाले. आमचे हिंदुत्व काढत असताना काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांबरोबर सत्ता स्थापन केली तेव्हा कुठे गेले होते तुमचे हिंदुत्व. हिंदुत्वाच्या गप्पा आम्हाला शिकवू नका, तुम्ही त्याला पात्र नाही,” असं मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं.
बाळासाहेबांच्या खोलीत झालेली चर्चा कशी विसरलात?
“बाळासाहेबांच्या खोलीत बंद दरवाजाआड पुढच्या वाटचालीची चर्चा केली, तेव्हा देवेंद्र तरी निर्लज्जपणाने आत ठरलेली गोष्ट बाहेर नाकारता, हे तुमचे हिंदुत्त्व. 2014 मध्ये युती तुम्ही तोडली, तेव्हाही आम्ही हिंदू होतो, आज ही आहोत, उद्या ही राहू,” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
विदर्भ वेगळा होणार नाही : मुख्यमंत्री
विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळं होणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. माझं आजोळ मी विसरलो नाही. माझं आजोळ माझ्यापासून तोडण्याचा तुमचा विचार मनातून काढून टाका, असं मुख्यमंत्री म्हणाले.