मुख्यमंत्र्यांचे मोठे अपयश,भारतीय सैनिकाचा अपमान : देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, त्यांनी औरंगाबादचं नामांतर करुन दाखवावं-फडणवीस

चौकातील भाषण आणि सभागृहातील भाषण हे अजूनही लक्षात आलेले नाही

औरंगाबाद, दिनांक 03 :आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सभागृहात मुख्यमंत्री बोलत होते ,राज्यपालांच्या अभिभाषणावर जी चर्चा झाली त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे.यात त्यांनी भाजपावर टीका केली , त्याला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यत्तर दिले आहे. महाराष्ट्र विधानसभेत महाराष्ट्राच्या विषयांवर मुख्यमंत्र्याना बोलता न येन हे मोठे अपयश असल्याचे फडणवीसांनी म्हणत मुख्यमंत्र्यांवर घणाघात केला आहे.
तासभराच्या भाषणात मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊच शकले नाही मुख्यमंत्री चीन बद्दल बोले ,पाकिस्तान बद्दल बोले, अमेरिकेवर बोले, बिहार बद्दल बोले , परंतु महाराष्ट्रावर बोले नाही असे म्हणत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांना चौकातले भाषण आणि सभागृहातले भाषण यातलं अंतर लक्षात आलं नसल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्रातील शेतकऱ्याबद्दल बोलत नाही , महाराष्ट्रातील शेतकऱयांना सोडून मुख्यमंत्र्यांना सिंधू बॉर्डर वर आंदोलनाला बसलेल्या शेतकऱयांची चिंता असल्याचे फडणवीस म्हणाले. 
हा भारतीय सैनिकाचा अपमान- फडणवीस  
चीन समोर आली कि पळे असं जे मुख्यमंत्री आज म्हणाले ,हा भारतीय सैनिकाचा अपमान असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे. एक इंच जमीन चीनला ज्या  सैनिकांनी घेऊ दिली नाही. त्यांचा अपमान मुख्यमंत्र्यांनी केला असल्याचा आरोप फडणवीसांनी 
केला आहे .

उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या भाषणांनंतर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली. फडणवीस म्हणालेत की, “राज्यपालांच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाला जी चर्चा झाली त्यासाठी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तब्बल एक तास बोलले. मात्र ते तासाभरात महाराष्ट्रात येऊ शकले नाहीत.

पुढे फडणवीस म्हणालेत की, “मुख्यमंत्री चीनमध्ये गेले, ते पाकिस्तानात गेलेत, ते अमेरिकेत गेलेत ते पंजाबमध्ये गेलेत, ते उत्तर प्रदेशात गेलेत, बिहारमध्ये गेलेत, काश्मीरमध्ये गेलेत, साऊथमध्ये गेलेत. मात्र महाराष्ट्राबाबत सभागृहात एकही वाक्य ते बोलू शकले नाहीत.”

चौकातील भाषण आणि सभागृहातील भाषण हे अजूनही लक्षात आलेले नाही

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता जुने झालेले आहेत. मात्र माननीय मुख्यमंत्र्यांना चौकातील भाषण आणि सभागृहातील भाषण हे अजूनही लक्षात आलेले नाही. सभागृहात उपस्थित मुद्द्यांवर बोलावं लागतं राज्याच्या प्रश्नांवर बोलावं लागतं. मात्र उद्धव ठाकरे यांनी सभागृहात शेतकऱ्यांच्या संदर्भात एकही मुद्दा मांडला नाही.  शेतकऱ्यांबाबत एकही मुद्दा मुख्यमंत्र्यांनी काढला नाही. महाराष्ट्रात साडे तीन लाख शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणाऱ्या मुख्यमंत्र्यांना सिंघू बॉर्डरवर बसलेल्या शेतकऱ्यांची वीज तोडली जातेय अशी मुख्यमंत्र्यांना चिंता असल्याचं फडणवीस म्हणालेत.

आज मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेलं उत्तर, या उत्तरकरता ‘भ्रमनिरास’ हा अतिशय लहानसा शब्द असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. 

शिवसेनेला इतिहास माहिती नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे स्वांतत्र्य सेनानी होते हे सेनेनं जाणून घ्यावं, अशा शब्दांत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

फडणवीस म्हणाले, “स्वातंत्र्यवीर सावरकारांना देशद्रोही आणि समलैंगिक म्हणणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात. तुमचं सरकार तयार झाल्यानंतर काँग्रेसनं एक पुस्तक काढलं त्यात याचा उल्लेख करण्यात आला होता. अशा काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले मुख्यमंत्री आम्हाला हिंदुत्व सांगायला निघाले हे मोठं आश्चर्य आहे. संभाजीनगरबाबत तर त्यांनी खूपच हास्यास्पद वक्तव्य केलं आहे.”

“शिवसेना कुठेही स्वातंत्र्य लढ्यात नव्हती हे मुख्यमंत्र्यांनी बरं झालं कबूल केलं. पण त्यांना हे माहिती नसेल की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे स्वातंत्र्य सेनानी होते. स्वातंत्र्यलढ्यात त्यांचं योगदान होतं याची माहिती त्यांनी घेतली नाही आणि इतिहासाची माहिती नसताना विनाकारण राजकीय भाषण त्यांनी केलं, असंही फडणवीस यावेळी म्हणाले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत भाजपवर चौफेर टीका केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पलटवार केला आहे. मुख्यमंत्र्यांनी भारतीय सैनिकांचा अपमान आहे. चीनसमोर पळ काढला हे मुख्यमंत्री म्हणाले, हा सैनिकांचा अपमान आहे, उणे 3 अंश सेल्सिअस तापमानात भारतीय सैन्य चीनशी लढले, एक इंचही भूमी चीनला मिळू दिली नाही, चिनी सैनिकांना मागे जावं लागलं. देशाच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडलं. मात्र, अशा सैनिकांचा मुख्यमंत्र्यांनी अपमान केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
“मुख्यमंत्र्यांना इतिहास माहिती नाही, त्यांनी अज्ञानातून भाषण केलं. जे खंडणी वसुली करतात, त्यांना राम मंदिरासाठी जनतेने केलेल्या समर्पणाची किंमत काय? मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, त्यांनी औरंगाबादचं नामांतर करुन दाखवावं, त्यांच्याकडून हे शक्यच नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फडणवीस यांच्या बोलण्यातील महत्वाचे मुद्दे :

  • शर्जील उस्मानी हा उत्तर प्रदेशातील आहे, पण त्या शर्जीलचं हिंदूविरोधात बोलण्याचं यूपीत धाडस नाही, तो महाराष्ट्रात येऊन बोलून जातो, त्याच्या केसाला हात लावायची या सरकारची हिम्मत नाही.
  • गृहमंत्री अमित शाह यांनी कोणताही शब्द दिलेला नव्हता. खोटं बोल पण रेटून बोल, हे नवं रुप पाहायला मिळालं.
  • सावरकरांना भारतरत्न नाही, पण सावरकरांना देशद्रोही आणि समलैंगिक म्हणणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये.
  • संभाजीनगरबाबत हास्यास्पद वक्तव्य केलं. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात कंटेट असेल तर प्रतिक्रिया देता येते.
  • शिवसेना स्वातंत्र्य लढ्यात नव्हती. पण डॉ. केशव हेडगेवार संघाचे संस्थापक स्वातंत्र्यसेनानी होते, याची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही.
  • जसं सरकारने राज्यपालांना दिलेलं भाषण महाराष्ट्राला दिशा देणारं नव्हतं, तसंच मुख्यमंत्र्यांचं चौकातलं भाषण होतं.
  • कोव्हिडबाबत आम्ही मांडलेल्या मुद्द्याला एकही उत्तर मुख्यमंत्री देऊ शकले नाहीत.
  • राष्ट्रद्रोह म्हणता, आम्ही त्यांच्यावर टीका केली तर महाराष्ट्रद्रोही, तुमचा भ्रष्टाचार बाहेर काढला तर महाराष्ट्रद्रोही, अरे पण भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्र बदनाम होतोय.