औरंगाबाद जिल्ह्यात 225 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,तीन मृत्यू

जिल्ह्यात 47128 कोरोनामुक्त, 2192 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 01 (जिमाका): औरंगाबाद जिल्ह्यात आज 130 जणांना (मनपा 108, ग्रामीण 22) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 47128 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 225 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 50591 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1271 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 2192 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (199) सातारा परिसर (2), शिवनेरी कॉलनी एन-9 (1),पिसादेवी (1), आदित्य नगर (1), एन-13 (1), यादव नगर (1), घाटी परिसर (2), बनकर निवास (1), छावणी (1), पेशवे नगर (1), उल्का नगरी (1), खाराकुऑ (1),एन-4 सिडको (1), जाधववाडी (1), शेंद्रा (1), एन-2 सिडको (1), कॅनाट प्लेस (1), एन-5 सिडको (6), संभाजी कॉलनी, एन-6 (1), बायजीपुरा (1), एन-1 सिडको (2), आरेफ कॉलनी (1), जालान नगर (1), खोकडपुरा (1), बीड बायपास (5), वेदांत नगर (1), बन्सीलाल नगर (2), काल्डा कॉर्नर (1), गादिया विहार (1), चैतन्य हा. सो (1), गारखेडा (3), सिंधी कॉलनी (1), भानुदास नगर (2), गजानन कॉलनी (1), शिवाजी नगर (3), विष्णू नगर (1), शास्त्री नगर (4), जवाहर कॉलनी (2), मल्हार चौक (1), श्रेय नगर (1), ज्योती नगर (3), एन वन सी सेक्टर (1), अन्य (133)

ग्रामीण (26)तिसगाव (1), सिडको महानगर (1), एन चार सिडको (1), अन्य (23)

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत गंगापूर तालुक्यातील पळसगावातील 45 वर्षीय पुरूष आणि सावंगीतील 70 वर्षीय स्त्री आणि खासगी रूग्णालयात नागेश्वरवाडीतील 72 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.