नांदेड जिल्ह्यात 55 व्यक्ती कोरोना बाधित तर एकाचा मृत्यू

नांदेड दि. 24 :- बुधवार 24 फेब्रुवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 55 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 11 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 44 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 30 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या 1 हजार 934 अहवालापैकी 1 हजार 873 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 23 हजार 339 एवढी झाली असून यातील 22 हजार 91 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 441 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 11 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. मंगळवार 23 फेब्रुवारीला हदगाव येथील 67 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 595 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 10, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 13, खाजगी रुग्णालय 7 असे एकूण 30 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.65 टक्के आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 25 हजार 250एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 97 हजार 459एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 23 हजार 339एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 22 हजार 91एकुण मृत्यू संख्या-595 उपचारानंतर बाधित रुग्ण घरी (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 94.65 टक्केआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-2आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-4आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-395रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-441आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-11.