भारताची सक्रिय रुग्णसंख्या आज 1.46 लाखांवर

भारताच्या लसीकरण मोहिमेने 1.21 कोटींचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2021

भारताने सक्रिय रुग्णसंख्या 1.50 लाखांखाली ठेवण्यात यश मिळवले आहे.देशातील सक्रिय रुग्णसंख्या आज  1,46,907 इतकी आहे. सध्याची सक्रिय रुग्णसंख्या भारताच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 1.33 टक्के इतकी आहे.

गेल्या 24 तासांत 13,742 इतक्या नवीन रुग्णांची  नोंद झाली असून 14,037 रुग्ण बरे झाले. यामुळे एकूण सक्रिय रुग्णसंख्येत  399  इतकी निव्वळ  घट झाली आहे.गेल्या 24 तासात सक्रिय रुग्णसंख्येत झालेला बदल दाखवला  आहे.  महाराष्ट्रात 298 रुग्णांची  भर पडली आहे, तर केरळमध्ये 803 रुग्णांची घट झाली  आहे.

गेल्या एका आठवड्यात 12 राज्यांमध्ये दररोज सरासरी  100 पेक्षा जास्त नवीन रुग्णांची  नोंद झाली आहे. महाराष्ट्र त्यापैकी एक आहे. आज 24 फेब्रुवारी,2021 रोजी,  सकाळी 7  वाजेपर्यंत एकूण 2,54,356 सत्रांद्वारे एकूण 1,21,65,598 लाभार्थ्यांचे  लसीकरण झाल्याचा अंदाज आहे.   यामध्ये  64,98,300 एचसीडब्ल्यू (1 ला डोस), 13,98,400 एचसीडब्ल्यू (2 रा डोस) आणि 42,68,898 एफएलडब्ल्यू (1 ला डोस) समाविष्ट आहे. आज भारतातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1,07,26,702 आहे. रुग्ण बरे होण्याचा दर आज  97.25 टक्के आहे. बरे झालेले एकूण रुग्ण  आणि सक्रिय रूग्णामधील अंतर सतत वाढत आहे आणि आज ते 1,05,79,795 इतके  आहे.

केंद्र सरकारने कोविड प्रतिसाद आणि व्यवस्थापनासाठी तसेच महामारीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांमध्ये मदत म्हणून महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरमध्ये  उच्चस्तरीय बहु-शाखीय पथके तैनात केली आहेत. तीन-सदस्यांच्या बहु-शाखीय  पथकांचे नेतृत्व आरोग्य मंत्रालयातील सहसचिव स्तरीय अधिकारी करत आहेत. ही पथके राज्ये / केंद्रशासित प्रदेश प्रशासनाबरोबर समन्वयाने काम करतील आणि कोविड-19  प्रकरणांमध्ये अलिकडे होत असलेल्या वाढीची कारणे शोधतील. संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक कोविड  नियंत्रण उपायांसाठी ते राज्य / केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य प्रशासनाशी समन्वय साधतील. कोविड व्यवस्थापनात आतापर्यंत झालेली प्रगती कायम राहील हे सुनिश्चित करण्यासाठी संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांबरोबर उद्भवणाऱ्या परिस्थितीचा नियमितपणे गंभीर आढावा घेण्याची सूचना राज्ये / केंद्र शासित प्रदेशांना करण्यात आली आहे.

भारताने 22 फेब्रुवारी रोजी कोरोना चाचणीत नवा विक्रम केला आहे. या दिवशी देशभरातील चाचण्यांच्या संख्येने 21.15 कोटींचा (21,15,51,746) टप्पा ओलांडला. देशातील चाचण्यांच्या प्रयोगशाळा आणि इतर साधनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, चाचण्यांची संख्या वाढवण्यात या प्रयोगशाळांची महत्वाची भूमिका आहे. या प्रयोगशाळांमुळे देशाची चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढली आहे.